
श्रीरामपूर प्रतिनिधी:-लोकसभा निवडणकीच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक क्र.२ श्रीरामपूर यांनी राहाता तालुक्यातील नांदूर शिवारात हातभट्टी गावठी दारूनिर्मिती करणाऱ्या केंद्रावर ता.६ एप्रिल रोजी मोठी कारवाई केली आहे.
या कारवाई मध्ये ०१ गुन्हा दाखल करण्यात आला असून ४१८० ली.कच्चे रसायन व ३०० ली.हातभट्टी गावठी दारू व हातभट्टी गावठी दारू निर्मितीचे लोखंडी व प्लॅस्टिक बँरल व इतर साहीत्य नष्ट करण्यात आले आहे.या मुद्देमालाची एकूण किंमत २ लाख ४ हजार ८००/-रु. इतकी आहे.
हि कारवाई राज्य उत्पादन शुल्क अहमदनगर अधीक्षक श्री.प्रमोद सोनोने,उपअधीक्षक श्री.प्रवीण कुमार तेली यांच्या मार्गदर्शनाखाली भरारी पथक क्र.२ श्रीरामपूर निरीक्षक श्री. अनुपकुमार देशमाने,श्री जी.एन.नायकोडी दुय्यमनिरीक्षक,श्री.एस. एस.पवार दुय्यम निरीक्षक , श्री.के.के.शेख सहा.दुय्यम निरीक्षक,श्री.एस.डी.साठे सहा.दुय्यम निरीक्षक, श्री.तौसीफ शेख जवान,व महिला जवान श्रीमती. एस.आर.फटांगरे,श्री.एन.एम. शेख जवान नि.वाहन चालक यांनी केली आहे.
श्री.अनुपकुमार देशमाने निरीक्षक,राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक क्र.२ यांनी दिली ही माहिती
अवैध हातभट्टी गावठी दारू निर्मिती व विक्री ठिकाणी व अवैध ढाबे यावर सातत्याने कारवाई केली जाणार