जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात रंगणार महिला कुस्तीचा थरार
अहमदनगर प्रतिनिधी (दि.५.जानेवारी):-अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात दि.६ जानेवारी पासून दादा पाटील महाविद्यालयाच्या प्रांगणात आंतरविद्यापीठ महिला कुस्तीचा थरार रंगणार आहे.या कुस्ती स्पर्धेमध्ये भारतातील १६० विद्यापीठातील जवळपास २ हजार महिला कुस्तीपटू,संघ व्यस्थापक आणि मार्गदर्शक कोच सहभागी होणार आहेत.तसेच या कुस्ती स्पर्धेचे वैशिष्ट्य म्हणजे या स्पर्धा मॅटवर घेतल्या जाणार आहेत. उद्यापासून या कुस्ती स्पर्धा दोन सत्रात खेळविल्या जाणार आहेत.सकाळी ९ ते १२ व दुपारी ४ ते ९ या कालावधीमध्ये या स्पर्धा संपन्न होणार आहे.ही स्पर्धा यशस्वीपणे राबविण्यासाठी आमदार रोहित पवार,विद्यापीठ क्रीडा संचालक प्रा.दीपक माने,प्रा.संतोष भुजबळ,प्रा.शिवाजी धांडे यांच्यासह कुस्तीप्रेमी अथक परिश्रम घेत आहेत.