देवगड विद्यालय हिवरगाव पावसा शाळेत आंतरशालेय विज्ञान-गणित प्रदर्शन संपन्न परिसरातील विविध विद्यालयातील शिक्षकांची उपस्थिती
संगमनेर प्रतिनिधी (दि.५.जानेवारी):-आजच्या प्रगतीच्या,धावपळीच्या विज्ञान युगात तसेच स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांना टिकून राहायचे असेल तरं त्यांच्यामध्ये विज्ञानवादी दृष्टीकोन विकसित होणे गरजेचे आहे.आपले विद्यालय हे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्त्वाचा विकास करण्यासाठी विविध उपक्रम राबवित असते.त्याचाच एक भाग म्हणजे आज भरविण्यात आलेले हे विज्ञान प्रदर्शन,विद्यार्थ्यांमधील सुप्त विज्ञानवादी विचारांना चालना मिळण्यासाठी,त्यांच्यातही एक शास्रज्ञ लपलेला आहे याची त्यांना जाणीव करून देण्याच्या अनुषंगाने विद्यालयात आंतरशालेय प्रदर्शन भरविण्यात आले होते. सदर कार्यक्रमाची सुरुवात विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.रमेश पावसे सर तसेच प्रमुख पाहुणे यांनी सरस्वती प्रथम पुजन करून केले.व त्यानंतर पाहुण्यांचे स्वागत व सत्कार करण्यात आले.याप्रसंगी आलेल्या पाहुण्यांनी विद्यार्थ्यांना विज्ञान युग त्यातील स्पर्धा तसेच त्याचे फायदे यावर सविस्तरपणे मार्गदर्शन केले.या प्रदर्शनामध्ये आपल्या विद्यालयातील विद्यार्थ्यांनी ७२ उपकरणे सादर केली.या अनोख्या प्रदर्शनास जि.प. प्राथमिक शाळा हिवरगाव पावसा,जि.प.प्राथमिक शाळा निमगाव टेंभी,जि.प. प्राथमिक शाळा शिरापुर या शाळांतील सर्व विद्यार्थी आणि शिक्षकांनी आनंदाने भेट दिली.त्यांचेही विद्यालयाच्या वतीने विशेष अभिनंदन करण्यात आले.या विद्यार्थ्यांना उपकरणांचे सादरीकरण, त्यांचे मनोरंजन व त्यांना खाऊचे वाटपही करण्यात आले.प्रदर्शनातील उपकरणांचे परीक्षण करण्यासाठी परीक्षक म्हणून श्री.भारत सातपुते सर,श्री कांबळे सर, श्री.बाळासाहेब राऊत सर होते. याप्रसंगी कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून प.पू.गगनगिरी विद्यालयाचे प्राचार्य श्री.मुकुंद डांगे सर , श्री.भारत सातपुते सर,सरपंच श्री.सुभाष गडाख सर,हनुमान विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक श्री.गणपत पावसे सर ,चंदनेश्वर विद्यालयाच्या पर्यवेक्षिका श्रीमती.उगले मॅडम, श्री.बाळासाहेब राऊत सर , श्री.गुळवे सर,श्री.सुरेश राहाणे सर ,श्री.यादवरावजी पावसे,श्री.दत्तात्रय पावसे,श्री प्रदीप कांबळे सर,ग्रामस्थ आदी मान्यवर उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वीतेसाठी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. रमेश पावसे सर, श्रीमती.हांडे मॅडम,गणित विषय शिक्षक श्री. नेहे सर,श्री माने सर,श्री.तातळे सर , विज्ञान विषय शिक्षक श्री.वाघ सर,श्री.थोरात सर, विज्ञान विषय शिक्षक श्री. तोरकडी सर,श्रीमती.भालेराव मॅडम, श्री.किरण शेळके सर,श्री.शांताराम पवार मामा,श्री.रवींद्र भालेराव मामा यांनी प्रयत्न केले.