नेवासा प्रतिनिधी (दि.५.जानेवारी):-अहमदनगर जिल्ह्यात नेवासा तालुक्यात शासनाने बंदी घातलेले दीड टन वजनाचे तीन लाख रुपये किमतीचे मांगूर जातीचे मासे व पिकअप नेवासा पोलिसांनी गिडेगाव शिवारातून जप्त केली असून या प्रकरणी दोघांना ताब्यात घेवून त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.याबाबत पोकॉ/रामचंद्र पांडुरंग वैद्य यांनी फिर्याद दिली आहे.३ जानेवारी रोजी सायंकाळी सव्वाचार वाजण्याचे सुमारास नेवासा तालुक्यातील गिडेगाव येथे पिकअपचा चालक अमोल सुदाम म्हस्के (वय २८) रा.गोगलगाव ता. नेवासा तसेच शालीद मंगलभीम गायकवाड (वय २१,रा.गारखेडा ता.जामनेर जिल्हा जळगाव) हे दोघे आपल्या ताब्यातील पिकअप जीप (एमएच १७ एजे ६५७५) मध्ये मागील भागात ताडपत्रीमध्ये असलेले पाणी व त्यातील अंदाजे दिड टन वजनाचे शासनाने प्रतिबंध केलेले मांगूर जातीचे जिवंत मासे १५० रुपये किलो दराचे एकूण किंमत तीन लाख रुपये एक पांढर्या रंगाची पिकअप जीप अंदाजे ५ लाख २५ हजार रुपये जप्त करण्यात आले असून दोघांवर भादंवीक १८८ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Trending Topics:
Trending
- ‘हॉटेल गुडलक’ ठरले बॅडलक..! मॅनेजर पदाच्या पूर्वतयारीवेळी तरुणाची हत्या..पळून जाण्याच्या बेतात असताना दोघांना एमआयडीसी पोलिसांनी ठोकल्या बेड्या..!
- अहिल्यानगराच्या बदलत्या चेहऱ्याचे दर्शन;तोफखान्यात सिद्धेश्वर बाल मंडळाचा ‘विकासाचे महामेरु सुजयदादा’ देखावा ठरतोय लक्षवेधी..!
- स्वस्तात सोन्याचे आमिष दाखवून फसवणूक करणारी आंतरजिल्हा टोळी जेरबंद:एलसीबीची मोठी कारवाई,नागपूरचे ३ भामटे गजाआड!
- मध्यस्थी जीवावर बेतली..! कत्तीने सपासप वार करून तरुणास संपवलं;पळणाऱ्या नराधमाच्या अखेर एलसीबीने कल्याण मधून आवळल्या मुसक्या..
- सुसंस्कृत व राष्ट्रभक्त तेजस्वी पिढीची निर्मिती मातेच्या हाती..!श्रमिकनगर येथे विश्वमांगल्य सभेची बैठक उत्साहात संपन्न;मातृशक्तीचा जागर करण्याचे संयोजिका रजनी भंडारी यांचे आवाहन..
- गर्दीत प्राण वाचवणार प्रशिक्षित हात..! जिल्हा रुग्णालयातर्फे गणेश मंडळांना आता मिळणार CPR धडे..
- रिपब्लिकन पार्टी ऑफ महाराष्ट्रची सुभेदारी विश्रामगृह येथे चिंतन बैठक संपन्न;संघटनात्मक बांधणीसह ऑक्टोबरमधील मेळाव्यावर भर!
- ‘त्या’ काळ्या स्कॉर्पिओवर पोलिसांचा छापा लाखोंची नामांकित दारू जप्त..अहिल्यानगर उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यपद्धतीवर मोठे प्रश्नचिन्ह?
