अहमदनगर प्रतिनिधी (दि.४.जानेवारी):-अवैध वाळू उपसा करून त्याची वाहतुक करणार्या एकाला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. शब्बीर बादशाह शेख (वय 32 रा. लाडजळगाव ता. शेवगाव) असे अटक केलेल्या वाळू वाहतुक करणार्याचे नाव आहे. त्याच्याकडून 15 लाख रूपये किंमतीचा हायवा, 60 हजार रूपयांची सहा ब्रास वाळू असा 15 लाख 60 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. शेवगाव तालुक्यातील बोधेगाव-गेवराई रोडवर सुकळी फाटा येथे बुधवारी सकाळी पोलिसांनी ही कारवाई केली.पोलीस अंमलदार रणजित जाधव यांच्या फिर्यादीवरून शेख विरोधात शेवगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला,अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे,स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस उपनिरीक्षक भाऊसाहेब काळे,विजयकुमार वेठेकर,लक्ष्मण खोकले, शंकर चौधरी,रविकिरण सोनटक्के, कमलेश पाथरूट, शिवाजी ढाकणे, जाधव यांचे पथक फरार व पाहिजे आरोपीचा शोध घेत असताना निरीक्षक कटके यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, बोधेगाव ते गेवराई रोडने एक पिवळ्या राखाडी रंगाचा बिना नंबरचा हायवा वाळु भरून चोरून बोधेगावच्या दिशेने येत आहे. सुकळी फाटा येथे जावून सापळा लावल्यास तो मिळून येईल. निरीक्षक कटके यांनी पथकाला कारवाई करण्याच्या सूचना केल्या.पथकाने सुकळी फाटा येथे जावुन सापळा लावुन थांबलो असता थोड्या वेळाने नमुद बातमी प्रमाणे एक पिवळ्या व राखाडी रंगाचा 10 चाकी हायवा बोधेगावच्या दिशेने येताना दिसला. पथकाने हायवा थांबवला असता चालकाने त्याचे नाव शब्बीर बादशाह शेख असे सांगितले. त्या हायवाची पंचासमक्ष झडती घेतली असता त्यामध्ये अवैधरित्या वाहतुक केली जात असलेली सहा ब्रास वाळू मिळून आली. पोलिसांनी हायवा, वाळू जप्त केली आहे. अधिक तपास शेवगाव पोलीस करीत आहेत.
Trending Topics:
Trending
- मध्यप्रदेशातून विक्रीसाठी आणले ५ गावठी कट्टे,सोनईत विक्रीची तयारी मात्र ‘एलसीबी’च्या धडक कारवाईने खेळ खल्लास..!
- एमआयडीसी पोलिसांचा धमाका:हॉटेल ‘गुडलक’ मधील निर्घृण हत्याकांडाचा पर्दाफाश.. तिसऱ्या आरोपीच्याही मुसक्या आवळल्या गुन्ह्याची दिली कबुली..
- नागपंचमीत महिलांचे दागिने लांबवणारी टोळी गजाआड..LCB च्या धाडीत लाखोंचे सोने जप्त..!
- ‘हॉटेल गुडलक’ ठरले बॅडलक..! मॅनेजर पदाच्या पूर्वतयारीवेळी तरुणाची हत्या..पळून जाण्याच्या बेतात असताना दोघांना एमआयडीसी पोलिसांनी ठोकल्या बेड्या..!
- अहिल्यानगराच्या बदलत्या चेहऱ्याचे दर्शन;तोफखान्यात सिद्धेश्वर बाल मंडळाचा ‘विकासाचे महामेरु सुजयदादा’ देखावा ठरतोय लक्षवेधी..!
- स्वस्तात सोन्याचे आमिष दाखवून फसवणूक करणारी आंतरजिल्हा टोळी जेरबंद:एलसीबीची मोठी कारवाई,नागपूरचे ३ भामटे गजाआड!
- मध्यस्थी जीवावर बेतली..! कत्तीने सपासप वार करून तरुणास संपवलं;पळणाऱ्या नराधमाच्या अखेर एलसीबीने कल्याण मधून आवळल्या मुसक्या..
- सुसंस्कृत व राष्ट्रभक्त तेजस्वी पिढीची निर्मिती मातेच्या हाती..!श्रमिकनगर येथे विश्वमांगल्य सभेची बैठक उत्साहात संपन्न;मातृशक्तीचा जागर करण्याचे संयोजिका रजनी भंडारी यांचे आवाहन..
