नगर प्रतिनिधी (दि.५.जानेवारी):-शहापुर चे सरपंच व त्यांचा भाऊ यांनी घटनेतील फिर्यादी बेरड यांना मारण्याचा प्रयत्न केला व तेव्हा पासून दोघेही फरार होते.परंतु दोन्ही भावांना भिंगार कॅम्प पोलीसांनी केली अवघ्या काही तासामध्ये अटक,घटनेतील हकीकत अशिकी दि.३ जानेवारी रोजी फिर्यादी नामे सोमनाथ भानूदास बेरड (रा.शहापुर ता.नगर जि. अहमदनगर) यांचे घराचे समोर राहणारे शहापुर गावचे सरपंच दत्तात्रय दिलीप भालसिंग व त्यांचा भाऊ संतोष उर्फ हेमराज दिलीप भालसिंग असे दोघे हातात लोखंडी कोयता व लोखंडी तलवार घेऊन फिर्यादीचे घरात घूसून फिर्यादीस घराचे बाहेर ओढून फिर्यादी याने भिंगार कॅम्प पोलीस स्टेशन येथे दिलेल्या फिर्यादीचे कारणावरून शहापुर गावचे सरपंच दत्तात्रय दिलीप भालसिंग व त्यांचा भाऊ संतोष उर्फ हेमराज दिलीप भालसिंग यांनी फिर्यादीस धक्काबुक्की करून शिवीगाळ,दमदाटी करून फिर्यादीला जिवे मारण्याच्या उद्देशाने सरपंच दत्तात्रय दिलीप भालसिंग याने त्याचे हातातील कोयता सरपंचाचा भाऊ संतोष उर्फ हेमराज दिलीप भालसिंग याचे हातातील तलवार फिर्यादीचे अंगावर भिरकावली त्यावेळी फिर्यादी यांनी वार हुकवला त्यावेळी घटना ठिकाणी हजर असलेला फिर्यादीचा साक्षीदार भाऊ सतिष भानूदास बेरड याचे नाकावर लागून ते जखमी झाले बाबत भिंगार कॅम्प पोलीस स्टेशन गु.र.नं 07/2023 भादविक 307,352,452,323,504,506,34 सह आर्म अँक्ट 4/25 प्रमाणे दि.02/01/2023 रोजी फिर्यादी सोमनाथ भानूदास बेरड (रा.शहापुर ता.नगर जि.अहमदनगर) यांनी दिलेल्या फिर्यादी वरून गुन्हा रजि.दाखल करण्यात आला होता.सदर गुन्ह्यात आरोपी हे गुन्हा घडले पासून फरार होते.दि.03/01/2023 रोजी यातील आरोपी नं.1) सरपंच दत्तात्रय दिलीप भालसिंग हे सैनिक नगर, डेअरी फार्म,भिंगार येथे तसेच आरोपी नं.2) संतोष उर्फ हेमराज दिलीप भालसिंग हा सावेडी,नगर मनमाड रोड,अहमदनगर येथे येणार असल्याची गुप्त बातमी दारा मार्फत बातमी मिळाल्याने भिंगार कॅम्प पोलीस स्टेशनचे दोन वेगवेगळे पथक तयार करून तसेच तांत्रीक विश्लेषन करून आरोपींना शोधण्याकरीता सापळा लावला असता यातील आरोपी नं.1) सरपंच दत्तात्रय दिलीप भालसिंग हे सैनिक नगर,डेअरी फार्म, भिंगार हा सैनिक नगर,डेअरी फार्म परीसरात मिळून आला तसेच सरपंचाचा भाऊ आरोपी नं 02 संतोष उर्फ हेमराज दिलीप भालसिंग हा सावेडी,नगर मनमाड रोड, अहमदनगर येथे मिळून आल्याने त्यांना सदर गुन्ह्यात अटक केली असून त्यांना दि.04/01/2023 रोजी मा.न्यायालयासमोर हजर केले असता मा.न्यायालयाने त्यांना 02 दिवस पोलीस कस्टडी रिमांड मंजुर केली आहे.रिमांड कालावधीमध्ये आरोपींनी गुन्ह्यामध्ये वापरलेले हत्यार जप्त करण्यात आले.सदरची कार्यवाही पोलीस अधिक्षक श्री.राकेश ओला,अपर पोलीस अधिक्षक श्री.प्रशांत खैरे,उपविभागीय पोलीस अधिकारी श्री.अनिल कातकडे यांचे मार्गदर्शनाखाली भिंगार कॅम्प पो.स्टे.चे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिशिरकुमार देशमुख,पोसई/एम.के. बेंडकोळी,पोहेकॉ/गोविंद जठार,पोहेकॉ/शफीक शेख,पोहेकॉ/रेवननाथ मिसाळ,पोहेकॉ/गणपत जठार,पोना/राहुल द्वारके,पोना/भानूदास खेडकर,पोना/राहुल गोरे, पोकॉ/महादेव निमसे,पोकॉ/ रमेश दरेकर,चापोकॉ/संजय काळे यांनी केली आहे.
Trending Topics:
Trending
- प्रभाग 10 मध्ये सविताताई घोडतुरेंची धडाकेबाज एन्ट्री..! विकासाची नवी दिशा..राजकारणाच्या समीकरणात खळबळ!
- निलंबित DYSP असल्याचे खोटे नाटक..! दोन पोलिस शिपायांना ४० लाखांना गंडा अहिल्यानगर मध्ये धक्कादायक प्रकार..!
- मोहटादेवी संस्थानच्या नवीन विश्वस्त मंडळाची घोषणा..! हे असतील विश्वस्त
- अंबरनाथ प्रभाग २५ मध्ये ‘सेवेच्या’ बळावर नवा दमदार चेहरा..स्वप्नाली शिंदे यांची निवडणुकीच्या रिंगणात धमाकेदार एन्ट्री..!
- प्रभाग ७ ला मिळणार विकासाचा नवा ध्यास..सामाजिक कार्यकर्ते संजय ठोंबरे यांची नगरसेवकपदासाठी दमदार दावेदारी..!
- अपंग महिलेशी एसटी कंडक्टरची आरेरावी..सामाजिक कार्यकर्त्या संध्याताई भगत संतप्त..!जबाबदार कर्मचाऱ्यावर निलंबनासह कठोर कारवाई करण्याची मागणी
- अहिल्यानगरची विकासदौड सुरु..! सुशोभीकरण मोहीम झंझावाती वेगात..शहराचा चेहरा मोहरा बदलणारच..आमदार संग्राम जगताप यांचे व्हिजन ठरतेय गेमचेंजर
- “जनतेच्या हक्काची नवी दिशा; प्रभाग १६ मधून जयश्रीताई टकले निवडणुकीच्या मैदानात!”
