संगमनेर प्रतिनिधी (दि.५.जानेवारी):-रायते तालुका संगमनेर येथील ग्रामपंचायत कार्यालयात व जि.प.प्राथमिक शाळा येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमेचे पूजन करुन अभिवादन करण्यात आले.क्रांतीज्योती पहिल्या महिला शिक्षिका सावित्रीबाई फुले यांनी महिलांच्या शिक्षणासाठी केलेले कार्य हे अतुलनीय असून त्यांच्या मुळे आज महिला विविध ठिकाणी आघाडीवर राहुन गावाचे, राज्याचे व देशाचे नेतृत्व करत असल्याचे मत रायते ग्रामपंचायतच्या सरपंच रुपाली रोहम यांनी व्यक्त केले.महिलांच्या आयुष्यात शिक्षणरूपी प्रकाश टाकण्याचे काम महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या माध्यमातून झाले असून त्यांच्यामुळे आज महिला शिक्षण,आरोग्य, क्रीडा,कला आदी क्षेत्रात आघाडीवर असल्याचे वि.वि.कार्यकारी सेवा सोसायटीचे चेअरमन माधवराव खर्डे यांनी सांगितले.यावेळी ग्रामपंचायत सदस्य सुरज पानसरे,छबुबाई नवले,शरद नवले वि.वि.कार्यकारी सेवा सोसायटीचे चेअरमन माधवराव खर्डे,आंबेडकर चळवळीतील सामाजिक कार्यकर्ते गौतम रोहम,ग्रामसेवक रविंद्र पर्बत,कलीम पिरजादेे ,सचिन अरगडे,जि.प.प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापीका श्रीमती कमलताई फटांगरे,स्कूल कमिटी अध्यक्ष जयराम आरोटे,स्कूल कमिटी उपाध्यक्ष सुनिल खर्डे,मारुतीराव कडलग,सय्यद सर, ग्रामपंचायत कर्मचारी बिपीन मेने,शंकर पवार आदी सह शालेय विद्यार्थी यावेळी उपस्थित होते.
Trending Topics:
Trending
- एमआयडीसी पोलिसांचा धमाका:हॉटेल ‘गुडलक’ मधील निर्घृण हत्याकांडाचा पर्दाफाश.. तिसऱ्या आरोपीच्याही मुसक्या आवळल्या गुन्ह्याची दिली कबुली..
- नागपंचमीत महिलांचे दागिने लांबवणारी टोळी गजाआड..LCB च्या धाडीत लाखोंचे सोने जप्त..!
- ‘हॉटेल गुडलक’ ठरले बॅडलक..! मॅनेजर पदाच्या पूर्वतयारीवेळी तरुणाची हत्या..पळून जाण्याच्या बेतात असताना दोघांना एमआयडीसी पोलिसांनी ठोकल्या बेड्या..!
- अहिल्यानगराच्या बदलत्या चेहऱ्याचे दर्शन;तोफखान्यात सिद्धेश्वर बाल मंडळाचा ‘विकासाचे महामेरु सुजयदादा’ देखावा ठरतोय लक्षवेधी..!
- स्वस्तात सोन्याचे आमिष दाखवून फसवणूक करणारी आंतरजिल्हा टोळी जेरबंद:एलसीबीची मोठी कारवाई,नागपूरचे ३ भामटे गजाआड!
- मध्यस्थी जीवावर बेतली..! कत्तीने सपासप वार करून तरुणास संपवलं;पळणाऱ्या नराधमाच्या अखेर एलसीबीने कल्याण मधून आवळल्या मुसक्या..
- सुसंस्कृत व राष्ट्रभक्त तेजस्वी पिढीची निर्मिती मातेच्या हाती..!श्रमिकनगर येथे विश्वमांगल्य सभेची बैठक उत्साहात संपन्न;मातृशक्तीचा जागर करण्याचे संयोजिका रजनी भंडारी यांचे आवाहन..
- गर्दीत प्राण वाचवणार प्रशिक्षित हात..! जिल्हा रुग्णालयातर्फे गणेश मंडळांना आता मिळणार CPR धडे..
