अहमदनगर प्रतिनिधी (दि.६.जानेवारी):-वस्तू आणि सेवा कराच्या जीएसटी नोंदणी प्रमाणपत्राचा अर्ज मंजूर करण्यासाठी नगर मधील खाद्यतेल व्यावसायिकाला नव्या कंपनीची एजन्सी घ्यायची असल्याने त्याने १३ डिसेंबर रोजी जीएसटी पोर्टल वर अर्ज केला होता व त्यानंतर निरीक्षक मुरली मनोहर याने त्या व्यावसायिकाला नगर शहरातील मार्केटयार्ड येथील किसान क्रांती बिल्डिंग मधील कार्यालयात बोलावून व यातील अर्जदाराची ओळख अधीक्षक विजयकुमार राऊत यांच्याशी करून दिली अर्जदाराने अर्जा समवेत जोडलेली वीज बिल त्याच्या वडिलांचे नावे असल्याने अर्ज ना मंजूर होईल असे या दोघांनी त्यांना सांगितले व एक हजार रुपये दिल्यास अर्ज मंजूर करून घेऊ असे म्हणत त्या दोघांनी लाचेची मागणी केली.अर्जदारांने त्याच दिवशी सीबीआयच्या अँटी करप्शन ब्युरो कडे तक्रार केली.अर्जदाराने एक हजार रुपये लाचेची रक्कम निरीक्षकाला देताच सीबीआयच्या अँटी करप्शन ब्युरोच्या निरीक्षक शितल शेंडगे यांच्या पथकाने दोघांना पैसे घेताना रंगेहात पकडले.अधीक्षक विजयकुमार राऊत (वय 55, रा.राहिंजमळा, केडगाव, नगर) व निरीक्षक मुरली मनोहर (वय 27, रा.अमितनगर,नगर) पैसे घेताना अटक केलेल्या दोघा अधिकाऱ्यांचे नाव आहेत.
Trending Topics:
Trending
- ‘हॉटेल गुडलक’ ठरले बॅडलक..! मॅनेजर पदाच्या पूर्वतयारीवेळी तरुणाची हत्या..पळून जाण्याच्या बेतात असताना दोघांना एमआयडीसी पोलिसांनी ठोकल्या बेड्या..!
- अहिल्यानगराच्या बदलत्या चेहऱ्याचे दर्शन;तोफखान्यात सिद्धेश्वर बाल मंडळाचा ‘विकासाचे महामेरु सुजयदादा’ देखावा ठरतोय लक्षवेधी..!
- स्वस्तात सोन्याचे आमिष दाखवून फसवणूक करणारी आंतरजिल्हा टोळी जेरबंद:एलसीबीची मोठी कारवाई,नागपूरचे ३ भामटे गजाआड!
- मध्यस्थी जीवावर बेतली..! कत्तीने सपासप वार करून तरुणास संपवलं;पळणाऱ्या नराधमाच्या अखेर एलसीबीने कल्याण मधून आवळल्या मुसक्या..
- सुसंस्कृत व राष्ट्रभक्त तेजस्वी पिढीची निर्मिती मातेच्या हाती..!श्रमिकनगर येथे विश्वमांगल्य सभेची बैठक उत्साहात संपन्न;मातृशक्तीचा जागर करण्याचे संयोजिका रजनी भंडारी यांचे आवाहन..
- गर्दीत प्राण वाचवणार प्रशिक्षित हात..! जिल्हा रुग्णालयातर्फे गणेश मंडळांना आता मिळणार CPR धडे..
- रिपब्लिकन पार्टी ऑफ महाराष्ट्रची सुभेदारी विश्रामगृह येथे चिंतन बैठक संपन्न;संघटनात्मक बांधणीसह ऑक्टोबरमधील मेळाव्यावर भर!
- ‘त्या’ काळ्या स्कॉर्पिओवर पोलिसांचा छापा लाखोंची नामांकित दारू जप्त..अहिल्यानगर उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यपद्धतीवर मोठे प्रश्नचिन्ह?
