नगर प्रतिनिधी (दि.६.जानेवारी):-अहमदनगर येथील यतीमखाना ॲण्ड बोर्डींग संस्थेतील तीन मुले भोजनासाठी न आल्याने शोध घेउन आढळून न आल्याने कोतवालीत गुन्हा दाखल करण्यात आला होता.अखेर ते मुले नातेवाईकांकडे मिळून आल्याची माहिती संस्थेचे अधीक्षक शेख गुफरान रफिक यांनी दिली.अहमदनगर यतीमखाना अँड बोर्डींग या संस्थेतील विदयार्थी शेख मोईन वसीम,शेख आयान सादिक,शेख रेहान वसीम हि तिन्ही मुले दि.०४ जानेवारी रोजी सायंकाळी ६.३० वाजता भोजनासाठी इतर मुलांबरोबर दिसुन न आल्यामुळे संस्थेतील कर्मचारी यांनी त्याचा शोध घेतला असता आढळून न आल्यामुळे त्यांच्या पालकांशी संपर्क करुन हि मुले घरी आले आहे का याची माहिती घेतली असता ते घरी परत आले नसल्यामुळे अखेर संस्थेचे अधीक्षक शेख यांनी कोतवाली पोलीस स्टेशन येथे मुले हरविल्या बाबत गुन्हा दाखल केला होता.परंतु सदर मुलांचे शोध घेण्यासाठी पालकांच्या मदतीने संस्थेचे कर्मचारी यांनी शोध घेतला असता हि तिन्ही मुले नातेवाईकांकडे सुखरुप मिळुन आलेली आहे.संस्थेद्वारे मुलांची सुरक्षतेची योग्य ती काळजी तसेच सांगली संगोपन करण्यात येत आहे.असे प्रसिध्दी पत्रकाद्वारे शेख यांनी कळविले आहे.
Trending Topics:
Trending
- शहर वाहतूक पोलिसांचा धडाका! २७० बेशिस्त चालकांवर अडीच लाखांचा दंड;काळ्या काचा अन् ट्रिपल सीटला नो एन्ट्री! शहरातील दाळमंडई भागातही मोठी कारवाई
- 🔥गोदावरी नदीपात्रात LCB ची मोठी धाड..! ५ लाखांहून अधिक मुद्देमाल जप्त..वाळूमाफियांमध्ये प्रचंड खळबळ!
- काळ्या काचा लावून फिरणाऱ्यांना वाहतूक पोलिसांनी भररस्त्यात शिकवला धडा..!काळ्या काचा अन् नियमांची पायमल्ली करणाऱ्या १५२ गाड्यांवर कारवाई ५६ कारवरून फिल्म जागीच काढली..!
- कराड प्रशासनाचा हलगर्जीपणा ! महिलांचा सन्मान अन् नागरिकांचा जीव धोक्यात.’आदिशक्ती’ चा उपोषणातून पेटला वणवा!भटक्या कुत्र्यांची दहशत अन् रुग्णालयाची दुर्दशा उपोषणाचा आज दुसरा दिवस..!
- स्थानिक गुन्हे शाखेचे मध्यरात्री भयानक ‘कॉम्बिंग ऑपरेशन..हद्दपार सराईत गुन्हेगाराला गावठी कट्ट्यासह घेतलं ताब्यात;मोठ्या नेटवर्कचा पर्दाफाश!
- इचलकरंजीत सावरकर चषक जलतरण स्पर्धेत कराडच्या पठ्ठ्यांचा धमाका! थेट सुवर्ण,रौप्य अन् कांस्य पदकांची लूट!कराडच्या अर्णव,तनवीरा अन् रुद्रांशचा राज्यस्तरीय स्पर्धेत जलवा!
- 🏆लातूरमध्ये मलकापूरचा डंका! रोटरी क्लबने एकाच रात्री पटकावले तब्बल १३ मानाचे पुरस्कार..
- 🚨थरारक! कराडच्या ‘या’ रस्त्यावर अवघ्या १० मिनिटांत ७-८ दुचाकीस्वार घसरले..ट्रकच्या चाकाखाली जाता-जाता वाचले प्राण..! नागरिकांचा रस्त्यावर उतरून उग्र आंदोलन करण्याचा इशारा..
