चोपडा प्रतिनिधी (दि.७.जानेवारी):-पत्रकार दिनानिमित्त ०६ जानेवारी २०२३ रोजी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची संपूर्ण महाराष्ट्र राज्यात जयंती उत्साहात साजरी केली जाते.६ जानेवारी हा पञकार दिन असुन महाराष्ट्रामध्ये पहिले मराठी वृत्तपञ दर्पण म्हणून आचार्य बाळशास्ञी जांभेकर यांनी सुरू केले व लोकांना स्वातंञ व हक्क आधिकारा करिता जन जागृती करण्याचे कार्य हाती घेतले असे संघटनेचे जळगांव जिल्हा सचिव हेमकांत गायकवाड आपल्या मनोगतात म्हणाले.त्याच प्रमाणे यंदा ही चोपडा येथील शासकीय विश्रामगृह येथे युवा पञकार बाधवातर्फे व स्वराज्य पोलिस मिञ पञकार संरक्षण आणि माहिती अधिकार संघटना,चोपडा तर्फे पञकार दिननिमित्त आचार्य बाळशास्ञी जांभेकर यांच्या प्रतिमेस हेमकांत गायकवाड यांच्या हस्ते माल्यर्पण करण्यात आले असुन संघटनेचे पदाधिकारी तथा युवा पञकाराच्या हस्ते पुजन करुन मानवंदना देण्यात आली.चोपडा येथील उपजिल्हा रुग्णालय येथे रुग्णांना फळ वाटप करण्याचे आयोजन करण्यात आले.स्ञी कक्ष पुरुष कक्ष,अपघात कक्ष या ठिकाणी कार्यरत असलेले आरोग्यसेविका,कर्मचारी वर्ग या सर्वांना ६५ रुग्णांना व कर्मचाऱ्यांना फळ वाटप करण्यात आले.कोरोना काळात कोणी कोणाच्या जवळ येत नव्हते व जवळ आले तरी सामाजिक अतंर ठेऊन तोडाला मास्क लावल्या शिवाय जवळ येत नव्हते त्या कोरोना काळात प्रदीर्घ सेवा बजावून जनसेवा करीत असताना आपल्या जीवाची कुटुंबाची कोणतीही परवाना करता स्वतःची सुरक्षा न वाढता जनसेवा हीच ईश्वर सेवा हिच धुरा मनाशी बाळगुन कोरोना काळात मयत झालेल्या रुग्णांचे शव स्वतः रुग्णवाहिके मध्ये टाकून अंत्यविधी व शेवटचा अग्नीडाग देखील प्रशांत पाटील उर्फ मामु यांनीच दिला.हे बहुमुल्य योगदान लक्षात घेऊन स्वराज्य पोलीस मित्र पत्रकार संरक्षण आणि माहिती अधिकार संघटनेतर्फे कोरोना योद्धा म्हणून प्रशांत पाटील उर्फ मामू यांचा सत्कार दैनिक साईसंध्या व दैनिक शौर्य स्वाभिमान वृत्तपत्राचे उपसंपादक व माहिती अधिकार संघटना जळगाव जिल्हा सहसचिव हेमकांत गायकवाड व संघटनेतील सर्व पत्रकार बांधव यांच्याकडून करण्यात आला याच रुग्णालयातील इतर उपस्थित कर्मचारी यांचा देखील सत्कार करण्यात आला व त्यानंतर त्यांना फळ वाटप करण्यात आले यावेळी हेमकांत गायकवाड,विनायक पाटील,सुनील पावरा,रवींद्र कोळी,मन्सूर तडवी,समाधान कोळी,मिलिंद वाणी व इतर सामाजिक कार्यकर्ते बाळू कोळी,समाधान बाविस्कर उपस्थित होते.
Trending Topics:
Trending
- प्रभाग 10 मध्ये सविताताई घोडतुरेंची धडाकेबाज एन्ट्री..! विकासाची नवी दिशा..राजकारणाच्या समीकरणात खळबळ!
- निलंबित DYSP असल्याचे खोटे नाटक..! दोन पोलिस शिपायांना ४० लाखांना गंडा अहिल्यानगर मध्ये धक्कादायक प्रकार..!
- मोहटादेवी संस्थानच्या नवीन विश्वस्त मंडळाची घोषणा..! हे असतील विश्वस्त
- अंबरनाथ प्रभाग २५ मध्ये ‘सेवेच्या’ बळावर नवा दमदार चेहरा..स्वप्नाली शिंदे यांची निवडणुकीच्या रिंगणात धमाकेदार एन्ट्री..!
- प्रभाग ७ ला मिळणार विकासाचा नवा ध्यास..सामाजिक कार्यकर्ते संजय ठोंबरे यांची नगरसेवकपदासाठी दमदार दावेदारी..!
- अपंग महिलेशी एसटी कंडक्टरची आरेरावी..सामाजिक कार्यकर्त्या संध्याताई भगत संतप्त..!जबाबदार कर्मचाऱ्यावर निलंबनासह कठोर कारवाई करण्याची मागणी
- अहिल्यानगरची विकासदौड सुरु..! सुशोभीकरण मोहीम झंझावाती वेगात..शहराचा चेहरा मोहरा बदलणारच..आमदार संग्राम जगताप यांचे व्हिजन ठरतेय गेमचेंजर
- “जनतेच्या हक्काची नवी दिशा; प्रभाग १६ मधून जयश्रीताई टकले निवडणुकीच्या मैदानात!”
