अहमदनगर प्रतिनिधी (दि.७.जानेवारी):-आधुनिक तंत्रज्ञानाचा गैरवापर करून सायबर फसवणुकीचे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत मात्र नागरिकांच्या सतर्कतेमुळे हे प्रकार टळू शकतात असे प्रतिपादन सायबर पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक सचिन रणशेवरे यांनी केले.पोलीस रेझिंग डे निमित्त स्व. रामलालजी ललवाणी मेमोरियल फाउंडेशनच्या वतीने संजीवनी कॉलनी येथे सायबर सिक्युरिटी व जनजागृती मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळेस श्री.रणशेवरे बोलत होते.यावेळी श्री.रणशेवरे यांनी सांगितले की,जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला,अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली अहमदनगर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात सायबर जनजागृतीचे कार्यक्रम हाती घेण्यात आले आहेत.स्मार्टफोन व सोशल मीडिया हे सायबर फसवणुकीचे मूळ आहे. त्यामुळे सोशल मीडिया हाताळताना अतिशय सतर्क रहावे. बँक महावितरण फोन पे गुगल पे ॲमेझॉन आर्मी किंवा इतर कोणत्याही संस्थेकडून बोलत असल्याची बतावणी करणाऱ्यांना आपल्या बँकेची,एटीएमची, क्रेडिट कार्डची माहिती किंवा ओटीपी देऊ नये.तसेच त्यांच्या सांगण्यावरून कोणतेही ॲप डाऊनलोड करू नये.अनोळखी व्यक्तींच्या सांगण्यावरून किंवा आर कोड स्कॅन करू नये. ओएलएक्स,फेसबुक, इंस्टाग्राम,क्विकर यासारख्या सोशल मीडिया साईट वरून अनोळखी व्यक्तींशी व्यवहार करू नये,त्यांना पैसे पाठवू नये.शेअर मार्केटमध्ये गुंतवण्यासाठी लोभापोटी अनोळखी व्यक्तींना पैसे पाठवू नयेत.लोन ॲप वरून लोन घेणे टाळावे.या माध्यमातूनही मोठ्या प्रमाणात फसवणुकीचे प्रकार वाढलेले आहेत.फेसबुक, इंस्टाग्राम,जीमेल,व्हाट्स अॅपमध्ये टू स्टेप वेरिफिकेशन ही सेटिंग करून आपले सोशल मीडिया अकाउंट हॅकिंग होण्यापासून वाचवता येऊ शकते. याचबरोबर सोशल मीडियावर अनोळखी व्यक्तींच्या आलेल्या फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारू नयेत.आदी महत्त्वपूर्ण मार्गदर्शक सूचना श्री.रणशेवरे यांनी यावेळी केल्या.यावेळी सायबर पोलीस स्टेशनचे पोना/अभिजीत अरकल यांनी सायबर फसवणूक कशाप्रकारे होते याची अनेक उदाहरणे देऊन यापासून कसे वाचावे याबाबत मार्गदर्शन केले. अनोळखी व्यक्तींच्या मागणीवरून कधीही ओटीपी शेअर करू नये.सोशल मीडियावरील फसव्या जाहिरातींच्या मोहाला बळी पडू नये.सायबर फसवणूक झाल्यास तात्काळ 1930 या क्रमांकावर संपर्क साधावा याचबरोबर आपल्या नजीकच्या पोलीस स्टेशनला तक्रार नोंदवावी.तसेच https://cybercrime.gov.in या वेबसाईटवर जाऊन तात्काळ ऑनलाईन तक्रार नोंदवावी इत्यादी महत्त्वपूर्ण माहिती पोना/श्री.अभिजित अरकल यांनी यावेळी उपस्थितांना दिली.यावेळी स्व.रामलालजी ललवाणी मेमोरियल फाउंडेशनचे अभय ललवाणी, विनय बिनायके,माजी नगरसेविका उषाताई ठाणगे,चंद्रकांत शिपणकर,प्रशांत मते,ज्ञानेश्वर शिपणकर,राजेंद्र बळे,गीता ललवाणी,सुनीता बिनायके, सोनाली गुगळे,रचना चुडीवाल,दीपिका चांडक, पूनम चांडक,चैताली ठाणगे, सुरभी बिनायके,मीनल लोढा, आदिती जोशी आदी उपस्थित होते.
Trending Topics:
Trending
- जिल्ह्यात छुप्या मार्गाने फोफावलेल्या अवैध वाळू तस्करी विरोधात LCB ची धडक कारवाई..तब्बल ३० लाखांचा मुद्देमाल जप्त..
- RTO च्या पत्राला तहसीलदारांनी दाखवली केराची टोपली..! नियमबाह्य लाल अंबर दिवा अद्यापही सुरू मनसे पुन्हा आक्रमक
- चिंचोली ग्रामसभेत युवकाचा जोरदार थरार..! पाण्याच्या टाकीसह शालेय घोटाळ्यांचे पितळ उघडे;बड्या कार्यकर्त्यांची बोलती बंद करत दिला थेट १ महिन्याचा अल्टीमेटम!
- ३ बड्या गुटखा माफियांवर एलसीबी चा एकाच वेळी छापा..! कारवाईने गुटखा माफीयांचे धाबे दणाणले..
- रिक्षा संघटनेचा मोठा स्फोट..! स्क्रॅप रिक्षांमधून १२०० रुपयांची हप्तेखोरी;अहिल्यानगरमध्ये स्वातंत्र्यदिनी रिक्षा संघटना काळे झेंडे दाखवून पालकमंत्र्यांना घेराव घालणार!
- आद्यनृत्यांगना नामचंद पवळा भालेराव यांच्या १५६ व्या जयंती निमित्त कार्यक्रमाचे आयोजन..सामाजिक,सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन,गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप
- अहिल्यानगर हादरले! मुकुंदनगरमधील खुनाचा थरार;गुन्हा करून पळालेल्या 3 आरोपींना पोलिसांनी हैद्राबादमधून उचलले! २४ तासांत ‘एलसीबी’ची धडक कारवाई
- कराड हादरले..! इतिहासात पहिल्यांदाच घडला ‘तो’ धक्कादायक प्रकार..बेजबाबदार कुत्र्याच्या मालकावर थेट FIR दाखल!
