नगर प्रतिनिधी (दि.७.जानेवारी):-अहमदनगर शहरात गोमांस विक्री करण्याच्या उद्देशाने गोवंशीय जातीच्या जनावराची कत्तल करणारा आरोपी मुद्देमालासह जेरबंद स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई,बातमीतील हकीकत अशी की श्री.राकेश ओला, पोलीस अधीक्षक, अहमदनगर यांनी पोलीस निरीक्षक,स्थानिक गुन्हे शाखा अनिल कटके यांना जिल्हयातील गोवंश जनावराची कत्तल व गोवंशी जनावराचे मांस विक्री करण्याच्या अवैधी धद्याचे उच्चाटन करणेसाठी माहिती घेवून कारवाई करणेबाबत आदेश दिले होते.नमुद आदेशान्वये स्थानिक गुन्हे शाखेचे पोहेकॉ/दत्तात्रय हिंगडे,संदिप घोडके,संदिप पवार,पोना/शंकर चौधरी,लक्ष्मण खोकले,पोकॉ/विनोद मासळकर,कमलेश पाथरुट सर्व नेमणुक स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगर असे अहमदनगर शहरात गोमांस विक्रीच्या धंद्यावर कारवाई करणेकामी पेट्रोलिंग करत असतांना श्री.अनिल कटके पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा,यांना गुप्त बातमी मिळाली की, खाटीक गल्ली,सांधू कारंजा मजिदच्या पाठीमागे, अहमदनगर येथे एका लोखंडी गेटच्या आतमध्ये एक इसम महाराष्ट्र राज्यामध्ये गोवंशी जनावरांचे कत्तल करुन गोमांस विक्री करण्याची मनाई असतांना देखील गोवंशीय जातीचे जनावराच्या मांसची विक्री करण्यासाठी कत्तल करीत आहे आत्ता गेल्यास मिळुन येतील अशी बातमी मिळल्याने पोलीस निरीक्षक श्री.अनिल कटके,स्थानिक गुन्हे शाखा यांनी सदर पथकास कारवाई करण्याचे आदेश देण्यात दिले.त्यानंतर सदर पथकाने बतमीतील नमुद पत्यावर अहमदनगर शहरातील खाटीक गल्ली, सांधू कारंजा मजिदच्या पाठीमागे एका लोखंडी गेटच्या आतमध्ये जावून खात्री केली असता सदर ठिकाणी एक इसम गोवंश जातीच्या जनावराची कत्तल करताना मिळून आला. सदर ठिकाणी छापा टाकून अंदाजे एकुण १,८०,०००/- रु किमंतीचे ९०० किलो गोमांस, व २००/- रु कि.एक सुरा मिळून आला.सदर ठिकाणी आरोपी नामे तौसिफ शरिफ शेख वय ४० वर्षे रा.सुभेदार गल्ली,व्यापारी मोहला, अहमदनगर यास ताब्यात घेऊन कोतवाली पोलीस स्टेशन येथे हजर केले.त्यांचे विरध्द कोतवाली पो.स्टे.गुरनं २१/२०२३ भादविक २६९,३४ महाराष्ट्र पशुसंरक्षण (सुधारणा) अधिनियम सन १९९५ चेकलम ५ (क),९ (अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदरची कारवाई डॉ.श्री.बी. जी.शेखर पाटील विशेष पोलीस महानिरीक्षक,नाशिक परिक्षेत्र,नाशिक,श्री.राकेश ओला पोलीस अधीक्षक,श्री.प्रशांत खैरे अपर पोलीस अधीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी,नगर शहर विभाग, अहमदनगर यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.
Trending Topics:
Trending
- बसस्टॅण्ड परिसरात अश्लील प्रकारांना लगाम..कोतवाली पोलिसांची धडक कारवाई..शहरातील वातावरण बिघडविणाऱ्यांवर कठोर भूमिका
- Politics..शिवसेनेच्या शहरप्रमुख पदी संभाजी अशोकराव कदम यांची नियुक्ती
- अहिल्यानगर एलसीबीची दणदणीत कामगिरी..खून,दरोडे,चोरी,शस्त्रसाठा,गोहत्या,NDPS कारवाईत गुन्हेगारांच्या मुसक्या आवळणारे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी राज्यस्तरावर सन्मानित
- Social work…शासकीय रुग्णालयांतील शुल्क आकारणी तात्काळ रद्द करा..अन्यथा तीव्र आंदोलन.. रिपब्लिकन पार्टी ऑफ महाराष्ट्रचा इशारा
- CRIME..पुरावा नष्ट करण्यासाठी तरुणाचा केला असा निर्घृण खून..गोणीत बांधलेला मृतदेह नदीत आढळला
- मानाच्या संगमनेर होलम काठी चे देवगड खंडोबा येथे उत्साहात स्वागत..खंडोबा भक्त सोमनाथ शिवाजी गुंजाळ यांच्याकडून महाप्रसादाचे दान
- शिकता-शिकता व्यापाराचे धडे..! निमगाव शाळेच्या बाल आनंद बाजारात २५ हजारांची कमाई..
- CRIME..LCB चा अवैध धंद्यांना चाप..! २६ लाखांचा मुद्देमाल हस्तगत..
