उमेद अभियान आणि उडान प्रकल्पाची हात मिळवणी…पारनेर तालुक्यातील १७ हजार महिला बालविवाह जागृती निर्माण करण्यासाठी घेणार पुढाकार…
पारनेर (प्रतिनिधी):-दि.२२ मे २०२४ रोजी स्नेहालय उडान प्रकल्प आणि उमेद अभियान यांच्या संयुक्त विद्यमाने बालविवाह प्रबोधन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उडान प्रकल्पाचे प्रकल्प व्यवस्थापक प्रविण कदम यांनी उपस्थित असलेले सर्व महिलांना बालविवाह प्रतिबंधक कायदा काय आहे.या विषयी माहिती दिली.
सावधगिरी संदेश देत म्हणाले की,कोणत्याही लग्नाला जात असला तर त्या मुलीचे १८ वर्ष पूर्ण आणि मुलाचे २१ वर्ष पूर्ण झाले आहे का… ? यांची निसंकोच पण खात्री करावी.यामुळे नकळत गुन्हातून आपण बचावले जाऊ शकतो.त्यांनतर विविध बालविवाहचे जिवंत उदाहरणे समोर मांडली.पालक सक्षमीकरण यावर सुद्धा मार्गदर्शन केले.
वेगवेगळ्या शासकीय योजना बदल चर्चा करून माहिती देण्यात आली.या वेळी पारनेर तालुका प्रमुख संदीप वाबळे यांनी सांगितले की,उमेद अभियान मधील पारनेर तालुक्यातील १७ हजार महिला बालविवाह रोखण्यासाठी आणि जनजागृती करण्याकरिता नक्कीच पुढाकार घेतील.उपस्थित सर्व CRP यांना आपल्या गावात व महिला बचत गटाच्या माध्यमातून पारनेर तालुक्यातील प्रत्येक गाव बालविवाह मुक्त गाव करून पारनेर तालुका बालविवाह मुक्त तालुका करण्यासाठी पुढाकार घ्यावा असेही त्यांनी आवाहन केले.या कार्यक्रमाला मध्ये सर्व तालुकाप्रमुख,प्रभाग प्रमुख, CRP ताई प्रमुख उपस्थिती होते.
प्रविण कदम उडान प्रकल्प,अहमदनगर
मो.9011026495