Maharashtra247

जनरेटर चोरणाऱ्या टोळीच्या नगर तालुका पोलिसांनी आवळल्या मुसक्या मुद्देमाल हस्तगत 

अहमदनगर (दि.२२ मे):-पुणे जिल्ह्यातील मुळशी येथुन किर्लोस्कर कंपनीचे जनरेटर भरून जि.नांदेड येथे घेऊन जाण्यासाठी निघालेला पिकअप नगर तालुक्यातील चास गावाच्या शिवारात लुटमार करणाऱ्या टोळीतील चार आरोपींना १२ लाख ७२ हजार ३०० रू.च्या मुद्दे मालासह नगर तालुका पोलिसांनी अटक केली आहे.बातमीची हकीगत अशी की,अमोल उध्दव साठे (धंदा ड्रायव्हर रा. सायकर वस्ती, वाकडगाव ठाण वाकड ता.मुळशी जि.पुणे) हे दि.२९/०३/२०२४ रोजी रात्रीच्या सुमारास चाकण म्हाळुंगे एमआयडीसी येथुन किलोस्कर कंपनीचे जनरेटर मशिन पिकपमध्ये भरून घेऊन जि.नांदेड येथे देण्यासाठी जात असताना दि. ३०/०३/२०२४ रोजी पुणे ते अहमदननगर रोडवर चास गावचे शिवारातील गुरु हॉटेलचे जवळ पिकअप समोर एक पांढरे रंगाची कार अचानक आली व त्यामधुन चार इसम खाली उतरुन ते जवळ येऊन फिर्यादी यांना गाडीचे खाली उतरवुन लाथाबुक्यांनी मारहाण करून त्या चार अनोळखी इसमांनी पिकअप गाडी व त्यामधील जनरेटर बळजबरीने पळून घेऊन फरार झाले होते.

घटनास्थळी ग्रामीणचे उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्यासह नगर तालुका पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रल्हाद गीते यांनी पथकासह घटनास्थळी बारकाईने पाहणी करून पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना तपासाबाबत योग्य ते मार्गदर्शन करत पथकातील अधिकारी पोलीस निरीक्षक प्रल्हाद गिते यांच्यासह पोलीस उपनिरीक्षक जयेश गांगुर्डे,पोलीस कर्मचारी दिनकर घोरपडे,सुभाष थोरात,धर्मराज दहिफळे,संभाजी बोराडे,कमलेश पाथरुट,राजू खेडकर,सागर मिसाळ पथकातील या पोलिस अंमलदारांनी सदर घटनास्थळ ते अहमदनगर पुणे महामार्ग ता.शिरूर जि.पुणे ते नगर शहरालगत केडगाव पर्यंत बारकाईने तपास करत असताना काही हॉटेल मधल्या सीसीटीव्ही मध्ये एक संशयित कार या ठिकाणावरून त्या ठिकाणी जात येतानी दिसत होते.

पोलीस पथकांनी संबंधित रेकॉर्डची बारकाईने तपास करून संशयित चारचाकी वाहन निष्पन्न करून तपासाला दिशा मिळाली होती त्यानुसार कार मालकचा शोध घेऊन तपास करत असताना नगर तालुका पोलीस पथकाला संबंधित व्यक्तीने प्रथम उडवा उडवीचे उत्तरे दिली त्यानंतर त्याला अधिक विश्वासात घेऊन विचारले असता संबंधित चोरी संदर्भात वैभव प्रदीप औटी रा.पारनेर,देवदत्त उर्फ देवा जंबे रा.म्हसने ता. पारनेर,अतुल तरटे रा. म्हसने ता.पारनेर,सुमित दिवटे रा.रूई छत्रपती ता.पारनेर असे आरोपी निष्पन्न झाली होती.नगर तालुका पोलिसांनी वरील ४ आरोपींना पारनेर तालुक्यातील मसने फाटा पारनेर व अहमदनगर येथून मोठ्या सीताफिने पकडून अटक केली.

सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला,अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे,नगर ग्रामीण उपविभागीय पोलीस अधिकारी संपतराव भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली नगर तालुका पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रल्हाद गिते यांच्या सूचने नुसार नगर तालुका पोलीस व मोबाईल सेलचे पोलीस कॉन्स्टेबल नितीन शिंदे यांनी केली आहे.

You cannot copy content of this page