कल्याण डोंबिवली हद्दीतील महिला व मुलींसाठी इंडोटेक फाउंडेशनच्या वतीने सुवर्णसंधी
मुंबई प्रतिनिधी:-इंडोटेक फाउंडेशनच्या वतीने महिला सक्षमीकरणासाठी,महिलांच्या प्रगतीसाठी वर्षभर वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केले जात असतात की यातून मुली व महिला या स्वतंत्र व्यवसाय करू शकतात.
यातून महिलांना रोजगाराची संधी उपलब्ध केली जाते.याचाच एक भाग म्हणून फाउंडेशनच्या वतीने कल्याण-डोंबिवली हद्दीतील महिला व मुलींसाठी भव्य रिक्षा चालवणे मोफत प्रशिक्षण देण्यात येणार आहे.यामध्ये २१ ते ४५ वर्ष वयोगटातील महिला या प्रशिक्षणाचा लाभ घेऊ शकतात.या प्रशिक्षणात सहभागी होण्यासाठी आधार कार्ड शाळेचा पुरावा दोन फोटो इ. कागदपत्रे आवश्यक आहेत.
हा कोर्स पूर्ण झाल्यानंतर सहभागी झालेल्या मुली व महिलांना शासनमान्य प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.तरी या प्रशिक्षणामध्ये जास्तीत जास्त महिला व मुलींनी सहभाग नोंदवावा असे आवाहन इंडोटेक फाउंडेशनच्या अध्यक्ष रेश्मा खरात यांनी केले आहे.
कार्यालय पत्ता:-१/१०४, संतकृपा अपार्टमेंट,ए विंग, दिवा स्टेशन रोड, शिवसेना शाखेचे समोर, युवा रेल्वे स्टेशन जवळ दिवा ठाणे पूर्व
संपर्कासाठी क्रमांक:-८०८०२२२५००/९७०२१०२७९३