वादातून डोक्यात घातला दगड झाला खून मात्र पळून जाण्याच्या तयारीत असताना आरोपी कोतवाली पोलिसांच्या जाळ्यात
अहमदनगर (दि.२२ मे):-खून करून पसार होण्याच्या तयारीत असलेल्या आरोपीला कोतवाली पोलिसांनी केडगाव परिसरातून अटक केली आहे.बातमीची हकिगत अशी की,दि.२१ मे रोजी रात्रीच्या सुमारास काटवन खंडोबा आगरकर मळयाकडे जाणा-या रोडवर शेती सर्वे नंबर चाहुराणा खुर्द 4/2 मध्ये असलेल्या पत्रा खोलीसमोर मोकळ्या जागेत अशोक कुमार अमरजित रा.बसोली.बु.पोस्ट बासगाव जि.गोरखपुर उत्तरप्रदेश यास प्रमोद दिपचंद विश्वकर्मा रा.बांकी,शेजवाडा जि.छिंदवाडा मध्यप्रदेश याने त्यांच्यातील वादाच्या कारणावरुन हातात दगड घेवुन अशोककुमार अमरजीत याच्या डोक्यात दगडाने दोन तीन वेळेस मारुन त्यास गंभीर जखमी करुन जिवे ठार मारले होते.
या घटनेची फिर्याद कोतवाली पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती.घटनेची माहिती समजतात शहराचे उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांच्या सह कोतवाली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांनी घटनास्थळास भेट दिली होती.कोतवाली पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांनी पोलीस अंमलदारांचे पथक तयार करून सदर घटनेतील आरोपीचा ठाव ठिकाणा शोधून आरोपी हा पळून जाण्याच्या तयारीत असताना आरोपी प्रमोद दिपचंद विश्वकर्मा रा.बांकी,शेजवाडा जि. छिंदवाडा मध्यप्रदेश याला केडगाव परिसरातून अटक केली.
हि कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला,अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी शहर विभाग अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली कोतवाली पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या गुन्हे पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक योगिता कोकाटे,पोलीस उपनिरीक्षक प्रवीण पाटील,चापोहेकॉ/सतीश भांड,पोलीस अंमलदार दिपक रोहकले,तानाजी पवार,सत्यम शिंदे,सुरज कदम,शाहिद शेख,अतुल काजळे,प्रमोद लहारे,अमोल गाडे,अविनाश वाकचौरे, रियाज इनामदार,सचिन लोळगे,याकूब सय्यद,औटी,कांबळे व सायबर सेलचे पोकाँ/राहुल गुंडू यांनी केली आहे.