Maharashtra247

नगर शहर व भिंगार शहरातील अनाधिकृत असलेल्या होर्डिंगवर कारवाई करण्यात यावी सामाजिक कार्यकर्ते सनी खरारे 

अहमदनगर (दि.२२ मे):-नगर शहर व भिंगार शहरातील अनाधिकृत असलेल्या होर्डिंग वर कारवाई करण्यात यावी अखिल भारतीय मेहतर समाज संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी यांचे अव्वल कारकून लाड व महानगरपालिका उपायुक्त मुंडे यांच्या बरोबर चर्चा करून निवेदन देण्यात आले.

या वेळी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,काही दिवसापूर्वी मुंबई व पुणे शहरात होर्डिंग कोसळण्याची घटना घडली असून या मध्ये अनेक नागरिक गंभीर जखमी झाले असून व काही नागरिक मृत्युमुखी पडले.तसेच नगर व भिंगार शहरात असे अनेक अनाधिकृत धोकादायक होर्डिंग आहे.मुंबई व पुणे अश्या मोठ्या शहरात होर्डिंग पडून जी दुर्घटना घडली नागरीकांना आपला जीव गमावा लागला.

नगर शहरामध्ये पण तशी घटना घडली पाहिजे का? प्रशासन याची प्रतीक्षा करत आहे का ? तसेच नगर शहरातील सतत वर्दळ असलेल्या स्टेट बँक चौकातील व्यापारी संकुलावर फ्लेक्स लावण्यासाठी भले मोठे लोखंडी अँगल बसविण्यात आले आहे.हे होर्डिंग धोकादायक असल्याचं माहित असूनही यासाठी संबंधित व्यक्तीला कशी परवानगी दिली या साठी कोणते नियम व निकष लावण्यात आले आहे का? जर भविष्यात एखादी दुर्घटना घडली तर त्याला जबाबदार कोण? असा मोठा प्रश्न नागरीकांच्या मनात निर्माण झाला आहे‌.तरी दिलेल्या निवेदनावर सहानभूतीपूर्वक विचार करून नगर व भिंगार शहरातील असलेले अनाधिकृत होल्डिंग वर लवकरात लवकर कारवाई करून ते होर्डिंग त्वरित काढण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे.

या प्रसंगी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सनिभैय्या खरारे,जिल्हा सचिव दीपक नकवाल,सामाजिक कार्यकर्ते आकाश ठाकुर,प्रशांत पाटोळे, विकास पंडित,तालेवार गोहेर,संजय खरे,धीरज बैद,आदी पदाधिकारी उपस्थित होते.

 

 

You cannot copy content of this page