चैन स्नेचींग करणारी टोळी गजाआड;स्थानिक गुन्हे शाखेच्या तपासाला यश;तब्बल १४ गुन्हे उघड;१७ लाख रु.किमतीचा मुद्देमाल हस्तगत
अहमदनगर (दि.२२ मे):-अहमदनगर जिल्ह्यात अत्यंत सराईत असणारी चैन स्नचिंग करणारी टोळीस जेरबंद करून तब्बल १४ गुन्हे उघड करून १७ लाख २० हजार रु.किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे.जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या आदेशाने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानी अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर, श्रीरामपूर,शिर्डी,कोपरगाव,शेवगाव,या ठिकाणी झालेल्या चैन स्नचिंग ठिकाणी भेट देऊन सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करून संशयित आरोपींची ओळख पटवण्यासाठी गुप्त बातमीदारांना फोटो दिले.
त्याच दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना गुप्त बातमी दारामार्फत माहिती मिळाली की सदरील गुन्हा हा रेकॉर्ड वरील आरोपी विनोद उर्फ खंग्या विजय उर्फ छल्या चव्हाण (रा.अशोक नगर श्रीरामपूर) याने साथीदारांसह सोबत केलेला आहे.तो त्याच्या साथीदारासह सोन्या चांदीचे दागिने विक्रीकरिता श्रीरामपूर ते नेवासे जाणारे अशोक नगर फाटा येथे येणार असल्याची माहिती मिळाली पोनि/दिनेश आहेर यांनी मिळालेली माहिती पथकास कळवून कारवाई करण्यास सांगितले.वरील मिळालेल्या माहितीनुसार पोलीस पथकाने सापळा रचून विनोद उर्फ खंग्या विजय उर्फ छल्या चव्हाण,सुनील शालीन पिंपळे यांना पकडले.
त्यांच्याकडे या घटनेबाबत विचारपूस केली असता त्यांनी त्यांचे साथीदार नामे विशाल सुनील पिंपळे,राजेश राजू सोलंकी,ऋषिकेश कैलास जाधव,रंगनाथ उर्फ रंग्या युवराज काळे, यांच्यासह गुन्हा केल्याची कबुली दिली आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींकडून १७ लाख २० हजार रु. किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे,श्रीरामपूर, शिर्डी,संगमनेर,शेवगाव उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोउपनि/सोपान गोरे, पोलीस अंमलदार दत्तात्रय हिंगडे,मनोहर गोसावी,रवींद्र कर्डिले, सचिन आडबल,संतोष लोढे,विजय ठोंबरे,संतोष खैरे,रणजीत जाधव, रोहित येमुल,बाळासाहेब गुंजाळ,सागर ससाने, प्रशांत राठोड,अमृत आढाव,उमाकांत गावडे,चंद्रकांत कुसळकर यांनी केलेली आ
हे.