Maharashtra247

विमाननगर प्रभाग क्रमांक ३ यमुनानगर येथील बुद्ध विहारात मोठ्या उत्साहात बुद्ध पौर्णिमा साजरी;बुद्ध” हे फक्त नाव नाही तर ज्ञानाची उपाधी आहे-शितल कांडेलकर

पुणे (प्रतिनिधी):-विमान नगर प्रभाग क्रमांक ३ यमुनानगर येथे बुद्ध विहारात मोठ्या उत्साहात बुद्ध पौर्णिमा साजरी करण्यात आली.

वैशाख महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी बुद्ध पौर्णिमा साजरी केली जाते.हा दिवस बुद्ध जयंती म्हणून देखील साजरा केला जातो,या दिवशी बौद्ध धर्माचे संस्थापक गौतम बुद्ध यांचा जन्म झाला.यावेळी आम आदमी पक्षाच्या शिक्षक आघाडीच्या शहर अध्यक्षा म्हणाल्या की,”बुद्ध” हे फक्त नाव नाही तर ज्ञानाची उपाधी आहे,’बुद्ध’ या शब्दाचा अर्थ आहे.

‘आकाशा एवढा प्रचंड ज्ञानी’ आणि ही उपाधी गौतम बुद्धांनी स्वप्रयत्‍नांनी मिळवली आहे.’संबुद्ध’ म्हणजे बुद्धत्व-संबोधी (ज्ञान) प्राप्त स्वतःवर विजय मिळवलेला आणि स्वतः उत्कर्ष करू शकणारा महाज्ञानी बुद्ध, आणि ‘संमासंबुद्ध’म्हणजे बुद्धत्व-संबोधी (ज्ञान) प्राप्त असलेला,स्वतः सोबतच संपूर्ण जगाचा उत्कर्ष उद्धार करू शकणारा महाज्ञानी बुद्ध. बौद्ध अनुयायी लोक शाक्यमुनी गौतम बुद्धांना वर्तमानातील सर्वश्रेष्ठ बुद्ध म्हणजेच ‘संमासंबुद्ध’ मानतात.

जगाच्या इतिहासातील महामानवांमध्ये तथागत बुद्ध हे सर्वश्रेष्ठ मानले जातात. बुद्धांच्या धम्माला (पंथाला वा तत्त्वज्ञानाला) ‘बौद्ध पंथ’ किंवा ‘बुद्धिझम’ म्हणतात.तथागत बुद्धांचा अनुयायांत दोन भाग पडतात.एक बौद्ध भिक्खू भिक्खूनींचा आणि दुसरा बौद्ध उपासक उपासिकांचा. बौद्ध पंथाच्या अनुयायांना “बौद्ध” किंवा “बुद्धिस्ट” म्हणतात.यावेळी बुद्ध विहार समितीचे अध्यक्ष श्री.अशोक मस्के,श्रीमती.मीनाताई ढाले,माजी अध्यक्ष श्रीमती.कांबळे ताई,आम आदमी पक्षाच्या शिक्षक आघाडी शहराध्यक्षा सौ.शितल कांडेलकर आणि मोठ्या संख्येने उपासक व उपासीका व नागरिक उपस्थित होते.

You cannot copy content of this page