ताबामारीचा आरोप असलेल्या वाणीनगरच्या त्या शेतजमिनीचा पवनकुमार अग्रवाल यांनी पत्रकार परिषदेमध्ये केला खुलासा
अहमदनगर (प्रतिनिधी)- सावेडी वाणीनगर येथील शेत जमिनीचा वाद चांगलाच पेटला असून स्थानिक महिला या खोट्या नाट्या तक्रारी अर्ज करून शासकीय मोजणी झालेल्या मिळकतीस वॉल कंपाऊंड करण्यास बेकायदेशीर हरकत घेत असल्याचा आरोप पत्रकार परिषदेमध्ये पवनकुमार अग्रवाल यांनी व्यक्त केला.
ते पुढे म्हणाले की,पाईपलाईन रोड वाणीनगर परिसरातील गट. क्र. 25/1ब व 25/1ड ही मिळकत शंकर वाणी यांच्याकडून दि.7 डिसेंबर 1992 मध्ये खरेदी खताने लिलावती नंदकिशोर अग्रवाल हिच्या नावे खरेदी केलेली होती व त्याचप्रमाणे मिळकतीचे महसूल दप्तरी नोंद झालेली होती.दरम्यान आई मयत झाल्यानंतर सदर मिळकतीस माझी व पवनकुमार नंदकिशोर अग्रवाल,हेमलता प्रकाश अग्रवाल,शिवप्यारी प्रमोद अग्रवाल,किरण प्रदीप कुमार अग्रवाल, आनंद प्रदीप कुमार अग्रवाल अपाक किरण, स्नेहा प्रदीप कुमार अग्रवाल अपाक किरण, राजलक्ष्मी प्रदीप कुमार अग्रवाल अपाक किरण, यांची नावाची वारसा हक्काने फेरफार क्र.25458 नोंद झालेली आहे.सदर मिळकतीशी गैरअर्जदार यांचा कोणताही संबंध नसताना देखील त्यांनी अहमदनगर येथील दिवाणी न्यायालयात खोट्या मजकूर चा दावा मनाई हुकुम व कब्जासाठी दाखल केलेला असून त्यामध्ये आम्ही हजर झालेलो आहोत सदरच्या दाव्यात कोणताही मनाई हुकूमाचा आदेश झालेला नाही.
दरम्यानच्या काळात सदर मिळकतीची पोलीस संरक्षणात मोजणी होऊन हद्दी खुणा निश्चित करण्यात आलेल्या आहे. त्याप्रमाणे मिळकतीस वॉल कंपाऊंडचे काम करण्यासाठी आम्ही दि. 22/5/2024 रोजी मजुरासमवेत मिळकतीमध्ये गेलो असता गैरअर्जदार यांनी आमच्या विरुद्ध खोट्या नाट्या मजकुराचा अर्ज करून प्रसारमाध्यमाकडे खोट्या नाट्या बातम्या आमच्या विरुद्ध प्रसिद्ध करून आम्हास वॉल कंपाऊंडचे काम करण्यास हरकत केलेली आहे.वास्तविक पाहता सदरचे मिळकत ही मूळची शंकर वाणी यांना कोर्ट वाटपाने मिळालेली असून सदर मिळकतीशी गैरअर्जदारचा एकही संबंध नव्हता व नाही व सदरची मिळकत आम्ही खरेदी खताने विकत घेतलेली असल्याने सदर मिळकतीशी गैर अर्जदारांचा कुठलाही संबंध नसल्याने सदर खरेदी बाबत अद्याप कोठेही तक्रार केलेली नाही अगर कोणतेही न्यायालयात सदरचे खरेदीखत आव्हानित केलेले नाही किंवा सदरचे खरेदीखत अद्याप कोणत्याही न्यायालयाने रद्दबाबत केलेले नाही परंतु गैरअर्जदार महिला असून त्यांच्याकडे मनुष्यबळ असल्याचा गैरफायदा घेऊन सदरची महिला अनअधिकाराने व बेकायदेशीरपणे आम्हास हरकत अडथळा करून आमच्या विरुद्ध खोट्या बातम्या प्रसिद्ध करीत आहे.
सदरच्या महिला व तिचे कुटुंबीय अतिशय अडदांड व नंगड प्रवृत्तीचे आहे.आमच्या खरेदी मालकीची मिळकत फुकटात हडप करण्याचा कुटील प्रयत्न करीत असून सदर गैर अर्जदारांचे कृत्य चुकीचे बेकायदेशीर असे असून आमच्यावर अन्याय करणारे आहे.व महिला असल्याचा गैरफायदा घेऊन कलम 354 सारख्या खोट्या केसेस करण्याची धमकी देत असून आमच्यावर दहशत निर्माण करीत आहे यामध्ये त्यांची 8 ते 10 जणांची टोळी असून ज्यावेळेस तेथे आम्ही मोजणीसाठी जातो त्या त्यावेळेस आम्हाला आडवूनुक करून कामास अडथळा आणतात व पैशाची मागणी करतात त्यामुळे गैरअर्जदार व त्यांच्या साथीदार यांनी केलेल्या व करत असलेल्या गैर कृत्याबाबत बेकायदेशीर हरकती बाबत त्यांच्यावर गुन्हे दाखल करून कायदेशीर कारवाई करण्याच्या मागणीसाठी पोलीस अधीक्षकांना निवेदन देण्यात येणार असून आम्हास आमच्या मिळकतीमध्ये बांधकाम करण्यास पोलीस संरक्षण देण्याची देखील मागणी करण्यात आली असल्याचे निवेदनात म्हटले आहे.