Maharashtra247

सावेडी उपनगरात ताबा गँगचा हैदोस!तोफखाना पोलीस निरीक्षकांवर पीडित महिलेने केले गंभीर आरोप!

अहमदनगर  (प्रतिनिधी):-मौजे सावेडी, अहमदनगर येथील गट क्रमांक २५/१अ, २५/१ब, २५/१क, २५/१ड या श्रीमती वेणूबाई विठ्ठल वाणी, रा. वाणी नगर, पाईपलाईन रोड यांच्या कुटुंबाच्या ताब्यातील राहते घर व शेतजमिनीचा बेकायदा ताबा घेण्यासाठी संगनमताने, कटकारस्थान रचून इसम नामे पवनकुमार नंदकिशोर अग्रवाल, गंगाराम हिरानंदानी या गुन्हेगारांच्या टोळीने तोफखाना पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री. कोकरे यांना सुपारी देऊन आम्हाला दमदाटी, दादागिरीने, बळजबरीने, अनाधिकाराने प्रवेश करून धक्काबुक्की करत महिलांना लज्जा उत्पन्न होईल अशी अश्लील शिवीगाळ केल्याप्रकरणी फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी करणारे निवेदन जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांना जेष्ठ नागरिक महिलांसह शिष्टमंडळाद्वारे भेट घेऊन लेखी निवेदन देत मागणी केली आहे.

यावेळी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. यावेळी आपली कैफियत मांडताना महिलांना अश्रू आणावर झाले. राजरोसपणे बेकायदेशीर रित्या अशा प्रकारे पोलीस संरक्षणात संगनमत करत ताबा मारण्यासाठी हैदोस घातला जात असेल तर आम्ही आणि आमच्या कुटुंबांनी शहरात जगायचं कसे ? असा संतप्त सवाल पीडित वेणूबाई वाणी यांनी केला आहे. श्रीमती वाणी यांनी गंभीर आरोप केले, असून म्हटले आहे की, सदर प्रकरण अत्यंत गंभीर स्वरूपाचे आहे. राजरोसपणे भाडोत्री गुंडांना पाठविले जात आहे. दहशत केली जात आहे. निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, सदर मिळकत गेल्या सुमारे ५० वर्षांपासून आमच्या ताब्यात आहे. असे असताना ही आमच्या राहत्या घरावर व शेतजमिनीचा बेकायदा ताबा घेण्यासाठी पोलीस निरीक्षक श्री. कोकरे यांना सुपारी देऊन येथे बेकायदेशीर रित्या मोठा पोलीस बंदोबस्त, फौज फाटा घेऊन येऊन आमच्या जागेत अनाधिकाराने, बळजबरीने, बेकायदा प्रवेश केला, दहशत माजवली व येथे राहणाऱ्या रहिवासी महिला व इतर यांना अश्लील भाषा वापरून, अपशब्द वापरून सदर जागा खाली करण्यासाठी दहशत निर्माण केली.

पोलिसांचे कर्तव्य नागरिकांचे रक्षण करणे असताना तेच आता गोरगरीब शेतकऱ्यांच्या जमिनी ताबा मारण्यासाठी व बेकायदारित्या घरे खाली करण्यासाठी आपल्या पदाचा गैरवापर करत आहेत. ही अत्यंत गंभीर बाब आहे. महिलांना अश्लील भाषेत शिवीगाळ करत लज्जा उत्पन्न होईल अशी वागणूक आम्हा महिलांना दिल्या प्रकरणी कठोर कलमा अन्वये फौजदारी स्वरूपाचा पुन्हा भारतीय दंड संहिता अन्वये तात्काळ दाखल करण्यात यावा. तसेच तोफखाना पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री. कोकरे हे लँडमाफिया, ताबा गँगचे हस्तक झालेले असून सामान्य जनता त्यांच्यापासून सुरक्षित राहिलेली नाही. त्यामुळे कायद्याचे राज्य स्थापित करण्यासाठी तोफखाना पोलीस स्टेशन येथे प्रामाणिक, कर्तव्यदक्ष, निडर, जनतेचे रक्षण करणारा चांगला अधिकारी नेमण्यात यावा अशी मागणी पीडित महिलेने जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

You cannot copy content of this page