Maharashtra247

विहीरीच्या कामासाठी लावलेल्या जिलेटिन कांड्यांचा स्फोट होऊन तिघांचा मृत्यू;मृत्यूस कारणीभूत असलेल्या फरार आरोपीस एलसीबीने केले जेरबंद

अहमदनगर (दि.१९ जुन प्रतिनिधी):-श्रीगोंदा येथील विहीरीच्या कामावरील ३ मजुरांच्या मृत्युस कारणीभुत असलेला आरोपीस स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केले आहे.श्रीगोंदा तालुक्यातील टाकळी कडेवळीत येथील शेतकरी वामन गेणा रणसिंग यांच्या विहीरीवर संजय शामराव इथापे (रा.टाकळी कडेवळीत,ता.श्रीगोंदा) याने विहीरी मधील ब्लास्टींगचे कामासाठी मजुर ठेवुन त्यांना कुठल्याही प्रकारचे प्रशिक्षण,साधने व सुरक्षा न देता मजुर जिलेटीनच्या कांड्या विहीरीचे होलमध्ये भरतांना स्फोट होवुन सुरज ऊर्फ नसीर युसूफ इनामदार,गणेश नामदेव वांळुज दोन्ही रा.टाकळी कडेवळीत,ता.श्रीगोंदा व नागनाथ भागचंद्र गावडे रा.बारडगांव,ता.कर्जत यांच्या मृत्युस व ३ मजुरांचे गंभीर दुखापतीस कारणीभुत झाले वरुन संजय शामराव इथापे यांचे विरुध्द श्रीगोंदा पो.स्टे.गु.र.नं. 589/2024 भादविक 304,285,286,337, 338 सह बारी अधिनियम कलम 3,4, 5 व 6 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

हा गुन्हा गंभीर स्वरुपाचा असल्याने जिल्हा पोलीस अधीक्षक श्री.राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि/श्री.दिनेश आहेर यांना वर नमुद गुन्ह्याचा समांतर तपास करुन गुन्ह्यातील फरार आरोपीचा शोध घेवुन कारवाई करणे बाबत आदेशित केले होते.नमुद आदेशान्वये स्थानिक गुन्हे शाखेतील पथक गुन्ह्यातील फरार आरोपींचा शोध घेत असताना स्थागुशा पथकाने फरार आरोपी नामे संजय इथापे याचा त्याचे राहते घरी तसेच त्याचे मित्र व नातेवाईकांकडे शोध घेतला असता आरोपी मिळुन येत नव्हता. दरम्यान पथक फरार आरोपीचा तांत्रिक विश्लेषणाचे आधारे शोध घेत असतांना पथकास गुप्तबातमीदारा मार्फत आरोपी नामे संजय इथापे हा हडपसर,जिल्हा पुणे येथे असले बाबत खात्रीशीर माहिती मिळाल्याने पथकाने हडपसर,जिल्हा पुणे येथे जावुन आरोपीचे वास्तव्याबाबत माहिती घेवुन,तो मिळुन आल्याने त्यास शिताफीने ताब्यात घेतले.

त्यास ताब्यात घेवुन श्रीगोंदा पोलीस स्टेशन येथे हजर केले आहे.पुढील तपास श्रीगोंदा पोलीस स्टेशन करीत आहे.सदरची कारवाई श्री.राकेश ओला पोलीस अधीक्षक,श्री.प्रशांत खैरे अपर पोलीस अधीक्षक, श्री.विवेकानंद वाखारे उविपोअ कर्जत विभाग यांचे सुचना व मार्गदर्शना खाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोउपनि/तुषार धाकराव व पोलीस अंमलदार बबन मखरे, रविंद्र कर्डीले,रोहित मिसाळ,देवेंद्र शेलार, भाऊसाहेब काळे,रविंद्र घुंगासे,अमोल कोतकर, मेघराज कोल्हे व चंद्रकांत कुसळकर यांनी केली आहे.

You cannot copy content of this page