Maharashtra247

खडांबे खुर्द ग्रामपंचायत मालकीच्या सौर ऊर्जा प्रकल्पावर चोरांचा डल्ला;प्रकल्प अद्याप सुरू झालेला नाही तेच साहित्याची झाली चोरी..!!

राहुरी (दीपक हरिश्चंद्रे):-राहुरी तालुक्यातील खडांबे खुर्द ग्रामपंचायत येथील मुख्य रस्त्यावर जवळील पशुवैद्यकीय दवाखान्यात समोरील सौर ऊर्जा प्रकल्पाच्या साहित्याची तीन दिवसांपूर्वी चोरीला जाण्याची घटना घडली आहे.

खडांबे खुर्द ग्रामपंचायतने सुमारे दोन वर्षांपूर्वी पशुवैद्यकीय दवाखान्यासमोर जलजीवन योजनेच्या संलग्नित असलेला २० सौर ऊर्जेच्या प्लेटा असलेला मोठा प्रकल्प   उभारण्यात आला होता याच सौर ऊर्जा प्रकल्पाद्वारे पारंपरिक पद्धतीने विज निर्मिती करून या संपवेल मधील साठविलेल्या पाण्याचा उपसा करून पाणी  मुख्य जलकुंभात सोडण्याची व्यवस्था केली होती त्याकरिता लागणारी वीज निर्मिती ही याच सौर ऊर्जा प्रकल्पातून तयार होईल अशी व्यवस्था करण्यात आलेली होती.

ग्रामपंचायत मालकीच्या २० सौर ऊर्जा प्रकल्पाच्या प्लेटा पैकी दहा प्लेटा या गेल्या चार दिवसांपूर्वी चोरीला जाण्याची घटना घडली आहे.या चोरीला गेलेल्या मुद्देमालाची अंदाजे किंमत ही ५०,०००/- इतकी आहे.सदर प्रकल्पाचे कामकाज हे पूर्ण झालेले होते वीज जोडणी व्यवस्थाही पूर्ण झालेले होती परंतु हा प्रकल्प अद्याप पर्यंत सुरूच झालेला नव्हता,  तरीही बसविण्यात आलेल्या सौर प्रकल्पाच्या प्लेटा चोरी जाण्याचा प्रकार घडला असल्याने ग्रामस्थांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.या घटनेबाबत खडांबे खुर्दचे ग्रामविकास अधिकारी शिवाजी लहानू ढगे यांच्या फिर्यादीवरून भारतीय दंड संहिता १८६० कलम ३७९ अंतर्गत अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला असून पुढील तपास राहुरीचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनात राहुरी पोलीस हे करत आहेत.

“शासनाच्या योजना एक तर सहजासहजी मंजूर होत नाही मंजूर झाल्या  तर कामही अतिशय धीम्या गतीने चालते गावात कुठेतरी नवीन प्रकल्प सुरू होणार होता परंतु तो सुरू होण्या आधीच जर या प्रकल्पाच्या साहित्याची अशा प्रकारची चोरी होत असेल तर यापेक्षा दुसरी खेदाची बाब दुसरी कोणतीही नाही.राहुरी पोलिसांनी या चोरांचा लवकरात लवकर छडा लावला.अशी विनंती समस्थ ग्रामस्थांच्या वतीने केली आहे.” 

श्री.दिपक हरिश्चंद्रे (पत्रकार/ग्रामस्थ खडांबे खुर्द)

“गेल्या दोन वर्षांपूर्वी  खडांबे येथील स्मशानभूमीतील पाळणा चोरीला गेला होता त्याचाही आद्याप पर्यंत तपास लागलेला नाही  या घटनेबाबत तरी प्रशासनाने गांबिर्याने तपास होऊन संबंधितांवर कायदेशीर योग्य ती कारवाई व्हावी.” 

गणेश पारे (मा.उपसरपंच खडांबे खुर्द)

You cannot copy content of this page