संगमनेर प्रतिनिधी (दि.१८ जानेवरी):-दि.17 जानेवारी 2023 रोजी सायंकाळी 5:30 वाजण्याची सुमारास मालपाणी कंपनीच्या जवळील नाशिक पुणे रोडच्या डिव्हायडर संगमनेर येथे मारुती स्विफ्ट क्रमांक MH 14 JH 0834 या गाडीचा चालक निशिकांत संजय घोडेकर याने त्याच्या ताब्यातील स्विफ्ट कार हयगयीने भरदाव वेगात चालवून डिव्हायडर लावलेले ब्रॅकेट उडवून देत गिरजा मुळशी तुरिया व वर्ष 52 जमुई,मरकामा,बिहार व सुरेश चैतू खैरवार वय वर्ष 55 जमुई,मरकामा,बिहार या दोघांना जोराची धडक देऊन गंभीर जखमी करत त्यांच्या मृत्यूस कारणीभूत झाला. याबाबत अमोल सुभाष बनसोडे वय वर्ष 33 हल्ली राहणार आनंदवाडी,चंदनापुरी,तालुका संगमनेर मूळ राहणार भातांगळी, जिल्हा-तालुका लातूर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी निशिकांत संजय घोडेकर सावरकर उद्यान मागे पंचवटी,नाशिक याचे विरोधात भादक 304(अ), 279,338 व मोटर वाहन कायदा कलम 184 प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले आहे.याप्रकरणी पोलीस नाईक महाले हे पुढील तपास करीत आहेत.