अहिल्यानगर (प्रतिनिधी):-निंबळक (ता.नगर) शिवारातील व्यावसायिक कुटुंबावर टोळक्याने हल्ला केल्याची घटना घडली.या हल्ल्यात व्यावसायिक राजू कोतकर यांच्यासह तिघे जखमी झाले आहेत.त्यांना उपचारासाठी नगर शहरातील खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.काल,रविवारी (2 मार्च) रोजी सायंकाळी ही घटना घडली आहे.
दरम्यान,हल्ला करणार्या दोघांना एमआयडीसी पोलिसांनी तात्काळ ताब्यात घेतले आहे.इतर संशयित आरोपी पसार झाले आहेत. त्यांच्या शोधासाठी पोलीस पथके रवाना केली असल्याची माहिती एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी यांनी दिली. निंबळक शिवारात राजू कोतकर यांचे किराणा दुकान आहे.त्यांच्या दुकानासमोर रविवारी सायंकाळी वाद झाले.
या वादाचे कारण समजू शकले नाही.या हल्ल्यात राजू कोतकर यांच्यासह तिघे जखमी झाले आहेत.त्यांना स्थानिक नागरिकांनी तातडीने उपचारासाठी नगर शहरातील खासगी रूग्णालयात दाखल केले.तेथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.त्यांच्या जबाबावरून गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे सहायक निरीक्षक चौधरी यांनी सांगितले.हल्ल्याचे कारण समजू शकले नाही.
दरम्यान,हल्ला करणाऱ्यांना तातडीने अटक करावी यासाठी स्थानिक नागरिकांनी ठिय्या आंदोलन केले होते.यां घटनेची माहिती मिळताच पोलीस उपअधीक्षक संपतराव भोसले, सहायक पोलीस निरीक्षक चौधरी यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली.पोलिसांनी दोघा संशयितांना ताब्यात घेतले असून इतरांचा शोध सुरू केला आहे.