अहिल्यानगर (प्रतिनिधी):- शहरातील मुकुंद नगर परिसरात दहशत माजवणाऱ्या आरोपींना भिंगार कॅम्प पोलिसांनी नुकतीच अटक केली आहे.13 मार्च रोजी सायंकाळच्या सुमारास गोसिया मस्जिद मुकुंद नगर इथून फिर्यादीं नमाज पठण करून मज्जिद जवळ असलेल्या त्यांच्या डायपर हाऊस दुकाना समोर असताना यातील आरोपी नामे आदिल शेख उर्फ मुन्ना,आदनान आदिल शेख,आफनान आदिल शेख,हसनेन आदिल शेख, नाजिद साजिद सय्यद,साजिद सय्यद यांनी संगणमत करून फिर्यादीच्या डोक्यात लोखंडी कोयता,लोखंडी पाईप व लाथ बुक्यांनी मारहाण करून गंभीर दुखापत करून शिवीगाळ व दमदाटी केली.फिर्यादी यांच्या डायपर हाऊस दुकानाचे व दोन मोटरसायकलींची तोडफोड करून नुकसान केली व तसेच दुकानातील रोख रक्कम गळ्यातील चैन घेऊन निघून गेले आहे.
या बाबत भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.गुन्हा घडल्यापासून आरोपी हे पसार झाले होते.सदरील गुन्ह्याचा तपास करत असताना सहाय्यक पोलीस निरीक्षक जगदीश मुलगीर यांना गुप्त बातमी दारामार्फत माहिती मिळाली की, आरोपी हे गोविंदपुरा नाका येथे आलेले आहे.मिळालेल्या माहितीनुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक जगदीश मुलगीर यांनी तपास पथकातील अंमलदार यांना नमूद ठिकाणी तात्काळ जाऊन खात्री करून कारवाई करण्याबाबत आदेशित केल्याने तपास पथकातील अंमलदार हे नमूद ठिकाणी जाऊन थांबले असताना आरोपींना पोलीस आल्याचा सुगावा लागल्याने तेथून पळून जाण्याचा प्रयत्न करू लागले परंतु त्यांचा पाठलाग करून आरोपींना पोलिसांनी अटक केली.
सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला,अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे,उपविभागीय पोलीस अधिकारी नगर शहर विभाग अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक जगदीश मुलगीर,पोलीस अंमलदार प्रमोद लहारे,दीपक शिंदे,अंकुश कासार,इस्त्राईल पठाण,समीर शेख यांनी केली आहे.