अहिल्यानगर प्रतिनिधी):- शिर्डी बसस्थानक परिसरात प्रवासी म्हणून आलेल्या इसमास पोलिसांनी व नगरपंचायतीच्या कर्मचाऱ्यांनी भिक्षेकरू समजून त्याला ताब्यात घेऊन विसापूर येथे नेण्यात आले व तसेच त्याच्यासह इतर तीन ते चार जणांना भिक्षेकरु समजून दोरीने बांधण्यात आले.
यावेळी त्यांच्या नातेवाईकांनी प्रशासनावर आरोप करत सिव्हिल हॉस्पिटल येथे संतप्त प्रतिक्रिया दिली,सिव्हिल हॉस्पिटल व विसापूर येथे झालेल्या मारहाणीत हे तीन ते चार इसम दगावलेले आहे.व यांचे दोरीने हात व पाय बांधण्यात आले होते यांना जेवण व पाणी सुद्धा पिण्यासाठी देण्यात येत नव्हते त्यांच्या हाता पायावर दोरीने बांधलेले तुकडे अजूनही तसेच आहे.यात त्यांचा मृत्यू झाला आहे. तरी या घटनेचा सखोल तपास होऊन आम्हाला न्याय मिळवून देण्यात यावा अशी मागणी मृताच्या नातेवाईकांनी केली आहे.