अहिल्यानगर (प्रतिनिधी):- गोवंश जातीचे जनावरांची कत्तल करण्याचे उद्देशाने वाहतुक करणा-या इसमावर कोतवाली पोलिसांनी धडक कारवाई करत 10 हजार रु. किमतीच्या दोन वासरांची सुटका केली आहे. सदरील कारवाई कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांना मिळालेल्या गुप्त बातमी दारामार्फत पोलिसांनी मध्यरात्रीच्या सुमारास केली आहे.याबाबत कोतवाली पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. 320/2025 महाराष्ट्र प्राणी संरक्षण (सुधारणा) अधिनियम सन 1976 चे कलम- 5 (अ), 1 सह प्राण्यांचा छळ प्रतिबंध अधिनियम 1960 चे कलम 11 व मोटार वाहन कायदा कलम 66 (1)/192 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुन्ह्याचा तपास पो.हे.कॉ./1212 रियाज इनामदार हे करित आहे.सदरची कारवाई ही पोलीस अधीक्षक श्री.राकेश ओला,अपर पोलीस अधीक्षक श्री.प्रशांत खैरे,उपविभागीय पोलीस अधिकार शहर विभाग श्री.अमोल भारती यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रताप दराडे,गुन्हे शोध पथकाचे स.पो.नि.योगिता कोकाटे,म.पो.हे.कॉ.रोहिणी दरंदले,पो.हे.कॉ.विशाल दळवी, पो.हे.कॉ.संदिप पितळे,पो.कॉ. दिपक रोहोकले,तानाजी पवार, सुरज कदम,शिरीष तरटे, दत्तात्रय कोतकर,राम हंडाळ, सचिन लोळगे,सोमनाथ केकाण, महेश पवार,म.पो.कॉ. प्रतिभा नागरे यांनी केली आहे.
