मेंढपाळांना जबर मारहाण करून दरोडा टाकणारी टोळी गजाआड,स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने येथे लावला सापळा..
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-मेंढपाळांच्या पालावर रात्रीच्या वेळी दरोडा टाकणाऱ्या टोळीस स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद करत विळद,अहिल्यानगर सह छत्रपती संभाजीनगर येथील दरोडयाचे गुन्हे उघडकीस आणून 5 आरोपीकडून 3 लाख 4,000/- रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. बातमीची हकिगत अशी की,दि. 09 जून 2025 रोजी फिर्यादी नामे पोपट बन्सी होडगर (वय 35,धंदा मेंढीपालन,रा.पिंप्री घुमट,विळद,ता.अहिल्यानगर) हे मेंढया चारुन रात्री शेतामध्ये कुटुंबियासह झोपले असताना अज्ञात 6 ते 7 आरोपीतांनी त्यांना लाकडी दांडक्याने मारहाण करुन,चाकुचा धाक दाखवून त्यांच्या पत्नीचे दागीने जबरीने चोरुन नेले होते याबाबत एमआयडीसी पोलीस ठाणे येथे गु.र.नं.447/2025 बीएनएस कलम 310 (2), 311 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पथक एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये गोपनीय माहिती व तांत्रीक विश्लेषणाच्या आधारे आरोपीचा शोध घेत असताना सदरचा गुन्हा किसन उर्फ विजय गौतम काळे (रा.पानसवाडी, ता.नेवासा,जि.अहिल्यानगर) याने त्याचे साथीदारासोबत केला असून ते चोरीचे सोने विक्री करण्यासाठी मोटार सायकलवरून नेवासा मार्गे अहिल्यानगर येथे पांढरीपुल येणार असल्याची माहिती प्राप्त झाली.पथकाने पंचासमक्ष मिळालेल्या माहिती वरून सापळा रचुन संशयीत आरोपीचा शोध घेऊन 1)भैय्या कडु काळे, वय 18, रा.शिरोडी,ता.गंगापूर, जि.छत्रपती संभाजीनगर 2) ताराचंद विरूपन भोसले, वय 35, रा.गाजगाव,ता.गंगापूर, जि.छत्रपती संभाजीनगर 3) किसन उर्फ विजय गौतम काळे, वय 23, रा.पानसवाडी, ता.नेवासा, जि.अहिल्यानगर 4) नागेश विरूपन भोसले, वय 20, रा.गाजगाव,ता.गंगापूर, जि.छत्रपती संभाजीनगर 5) सोनुल लक्षरी भोसले,वय 19, रा.बिडकीन, ता.पैठण, जि.छत्रपती संभाजीनगर अशांना ताब्यात घेतले.
ताब्यातील आरोपीकडे गुन्हयाबाबत विचारपूस केली असता त्यांनी त्यांचे साथीदार 6) बदाम कडू काळे,रा.शिरोडी, ता.गंगापूर, जि.छत्रपती संभाजीनगर (फरार) 7) रघुवीर विरूपन भोसले, रा.गाजगाव, ता.गंगापूर, जि.छत्रपती संभाजीनगर (फरार) 8)महेश नंदु काळे, रा.खोसपुरी, ता.अहिल्यानगर (फरार) अशांना मिळून अहिल्यानगर जिल्हयातील विळद गावातील डोंगर माथ्यावर असलेल्या मेंढपालाचे पालावर पाच ते सहा दिवसापुर्वी रात्रीचे वेळी महिला व पुरूषांना मारहाण करून चोरी केल्याची माहिती सांगीतली.पंचासमक्ष ताब्यातील आरोपीकडून 3,04,000/- रूपये किंमतीचा मुद्देमाल त्यात 12 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागीने, चार मोबाईल व दोन मोटार सायकल जप्त करण्यात आल्या आहेत.पथकाने ताब्यातील आरोपीतांना विश्वासात आणखी कोठे गुन्हे केले आहेत अगर कसे याबाबत विचारपूस केली असता आरोपीतांनी मागील 10 ते 15 दिवसापुर्वी मांजरी शिवार, ता.गंगापूर, जि.छत्रपती संभाजीनगर मेंढपाळाच्या पालावर रात्रीचे वेळी मारहाण करून चोरी केल्याची माहिती सांगीतली.ताब्यातील आरोपीतांना एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे गुरनं 447/2025 या गुन्हयाचे तपासकामी मुद्देमालासह एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात असून गुन्हयाचा पुढील तपास एमआयडीसी पोलीस स्टेशन हे करीत आहेत.
सदरची कारवाई श्री.सोमनाथ घार्गे पोलीस अधीक्षक,श्री. प्रशांत खैरे अपर पोलीस अधीक्षक,श्री.दिनेश आहेर स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोसई/तुषार धाकराव, पोलीस अंमलदार दत्तात्रय हिंगडे,बिरप्पा करमल,गणेश धोत्रे,अरूण गांगुर्डे,भगवान धुळे, गणेश लोंढे,शाहीद शेख, फुरकान शेख,बाळासाहेब नागरगोजे,सोमनाथ झांबरे,रविंद्र घुंगासे,आकाश काळे,भगवान थोरात,भाऊसाहेब काळे,सुनील मालणकर,रमीजराजा आत्तार, अमोल कोतकर,अमृत आढाव, प्रशांत राठोड,मेघराज कोल्हे, चंद्रकांत कुसळकर व अरूण मोरे यांनी केलेली आहे.