अखेर केडगाव येथील खुनाच्या गुन्ह्याची उकल करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश..पोलिसांनी तांत्रीक विश्लेषण व गोपनीय माहितीच्या आधारे असा केला तपास
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-उपनगरातील केडगाव येथील अनोळखी व्यक्तीचा खुनाचा गुन्हा स्थानिक गुन्हे शाखेने उघडकीस आणत 3 संशयित आरोपीतांना स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे.
बातमीची हकिगत अशी की,दि.22 जून 2025 रोजी केडगाव इंडस्ट्रियल एरियामधील नागछाप हिंग कंपनीच्या मोकळया जागेत अनोळखी पुरूष जखमी अवस्थेत बेशुध्द पडलेला असून त्याचे अंगावर जखमा व मारहाणीचे वळ होते.जखमीस वैदयकीय औषधोपचारकामी सिव्हील हॉस्पीटल,अहिल्यानगर येथे पाठविले असता वैदयकीय अधिकारी जखमीस मयत घोषीत केल्याने कोतवाली पोलीस स्टेशन येथे 88/2025 प्रमाणे अकस्मात मृत्यू नोंद करण्यात आली होती.अकस्मात मृत्यूचे तपासात वैदयकीय अधिकारी यांनी दिलेल्या अभिप्रायावरून अनोळखी इसमास कोणीतरी अज्ञात इसमाने अज्ञात कारणावरून कठीण व टणक हत्याराने जबर मारहाण करून जीवे ठार मारून मयताची ओळख पटू नये म्हणुन पुरावे नष्ट केले.याबाबत कोतवाली पोलीस ठाणे येथे गुरनं 583/2025 बीएनएस कलम 103 (1), 238 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.नमूद घडलेल्या गंभीर गुन्हयांची प्राथमिक माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे अहिल्यानगर,अपर पोलीस अधीक्षक यांनी घटना ठिकाणास भेट देऊन,स्थानिक गुन्हे शाखेस अनोळखी मृतदेहाची ओळख पटवून,गुन्हा उघडकीस आणणेबाबत आदेशीत केले.त्यानुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि/श्री.दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखा व तपास पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना गुन्हयाच्या तपासाबाबत सुचना व मार्गदर्शन करुन पथकास रवाना केले.तपास पथकाने गुन्हयाचे घटनाठिकाणी भेट देऊन, घटनाठिकाणचे जवळील व केडगाव ते कायनेटीक चौक, अहिल्यानगर मार्गावरील 20 ते 25 सीसीटीव्ही फुटेज व तांत्रीक विश्लेषणाच्या आधारे 1)संदेश संजय क्षेत्रे 2)अमन असीरमिया शेख व 3) मंगेश कालीदत्त कांबळे,सर्व रा.केडगाव, अहिल्यानगर असे आरोपी गुन्हयाचे तपासात निष्पन्न केले.
ताब्यातील आरोपीस विश्वासात घेऊन गुन्हयाचे अनुषंगाने विचारपूस केली असता आरोपी हे मोपेड गाडीवरून पुणे बस स्टॅण्ड,अहिल्यानगर येथून केडगावकडे जात असताना रस्त्यावर थांबलेल्या अनोळखी इसमास लुटमार करण्याच्या उद्देशाने त्यास मोपेड गाडीवर जबरीने बसवून त्यास केडगाव इंडस्ट्रियल परिसरात नेऊन मारहाण केली.अनोळखी व्यक्तीकडील बॅग,खिशामधील पैसे व एटीएम कार्ड काढुन घेऊन,मयतास एटीएम पीनची विचारणा करून आरोपी संदेश संजय क्षेत्रे हा एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी गेला असता एटीएमचा पीनकोड चुकीचा असल्याने पैसे निघाले नाहीत. मयतास लुटण्याच्या उद्देशाने आरोपीतांनी मयतास लाकडी काठी व दगडाने जबर मारहाण करून त्यास जीवे ठार मारले. ताब्यातील आरोपीस गुन्ह्याचे तपासकामी कोतवाली पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आले असुन गुन्हयाचा पुढील तपास कोतवाली पोलीस स्टेशन हे करीत आहे.सदर कारवाई श्री.सोमनाथ घार्गे पोलीस अधीक्षक अहिल्यानगर,श्री.प्रशांत खैरे, अपर पोलीस अधीक्षक,श्री.अमोल भारती, उपविभागीय पोलीस अधिकारी, नगर शहर उपविभाग यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोसई/तुषार धाकराव, पोलीस अंमलदार शाहीद शेख, संदीप पवार,फुरकान शेख, विजय ठोंबरे,रविंद्र घुंगासे,मयुर गायकवाड,भगवान थोरात, विशाल तनपुरे,प्रशांत राठोड, मेघराज कोल्हे,भगवान धुळे यांनी केलेली आहे.