जामखेड येथील अखिल भारतीय नाथपंथी डवरी गोसावी समाज महासंघाच्या वतीने तहसीलदार यांना निवेदन..शिव गोरक्षनाथ नाथपंथी समाज अर्थिक विकास महामंडळ नाव देण्याची मागणी
जामखेड (प्रतिनिधी):-अखिल भारतीय नाथपंथी डवरी गोसावी समाज महासंघ जामखेड तालुका यांच्या वतीने तहसीलदार गणेशजी माळी यांना निवेदन देण्यात आले.अखिल भारतीय नाथपंथी डवरी गोसावी समाजाच्या महामंडळाच्या परमपूज्य गंगानाथ महाराज अर्थिक विकास महामंडळ हे नाव रद्द करून शिव गोरक्षनाथ नाथपंथी समाज अर्थिक विकास महामंडळ हे नाव देण्यात यावे.या महामंडळाला दिलेल्या नावाचे परमपूज्य व्यक्ती आमच्या समाजामध्ये होऊन गेले नाही. नाथपंथी डवरी गोसावी समाजाला विश्वासात न घेता परस्पर हे नाव महामंडळाला देण्यात आले आहे.या नावात बदल करून वसंतराव नाईक महामंडळ उपकंपनी न राहता स्वयतता महामंडळ दर्जा द्यावा. या मागणीसाठी नाथपंथी डवरी गोसावी समाजाच्या वतीने तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी अहिल्यानगर जिल्हा उपाध्यक्ष अजिनाथ शिंदे, संतोष शेगर (पत्रकार),साहेबराव शिंदे,मोहन भगवान चव्हाण, मोहन रामा शिंदे,जयप्रकाश शेगर,अरुण सुदाम चव्हाण, विजय तात्या शेगर,दादाहरी बाबुराव सावंत,राजू शिंदे, नामदेव शिंदे, अरुण शिंदे, तानाजी चव्हाण, सावळा शिंदे, साहेबराव शेगर, सोनाबाई शेगर, सखुबाई शिंदे, भिमाबाई चव्हाण, सुलाबाई शेगर, प्रकाश शिंदे, कैलास तात्या शेगर व इतर कार्यकर्ते जामखेड तालुक्यातील प्रत्येक गावातील समाज बांधव व प्रतिनिधी उपस्थित होते.