‘त्या’ प्रतिष्ठित जुगार अड्ड्यावर विशेष पोलीस पथकाचा छापा..37 लाख रुपये हस्तगत
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-श्रीगोंदा पोलीस स्टेशन च्या हद्दीत परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक श्री.संतोष खाडे यांच्या नेतृत्वाखाली विशेष पोलीस पथकाने सोनवणे वस्ती येथील एका जुगार अड्ड्यावर छापा टाकला आहे. या कारवाई दरम्यान पोलिसांनी तीन ठिकाणी जमून बसलेल्या इसमांना रंगेहाथ पकडले असून मात्र पोलीस पथकाची चाहूल लागताच काहीजण पळून जाऊ लागले, पोलिसांनी पाठलाग करून २२ जणांना अटक केली.
अटक करण्यात आलेल्या इसमांकडून २,२२,८००/- रुपये रोख, ५,९६,०००/- किमतीचे २० मोबाईल फोन व २८,९०,०००/- रुपये किमतीची ९ वाहने असा एकूण ३७,५८,३००/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी श्रीगोंदा पोलीस स्टेशनमध्ये महाराष्ट्र जुगार कायद्यानुसार गु.र.नं. ६३७/२०२५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अटक करण्यात आलेल्या इसमांमध्ये स्वप्नील राजू खेत्रे, अविनाश घोडके,भाऊ गोरे, अजय भळगट,प्रविण काळे, शब्बीर पठाण,सलीम सप्यय, शुक्राचार्य रेखगे, गणेश वैद्य, राहुल फुंद, लक्ष्मण शेजवळ, ताहीर शेख, हनुमंत शितोळे, गहिनीनाथ रणसिंग, लक्ष्मण जाधव, गणेश अहिवळे, बाळू नवले, सचिन बनाकर, धनंजय गलांडे, सचिन चखाले, युवराज जाधव व योगेश मोचे यांचा समावेश आहे. तसेच दीपक मखरे आणि हेमंत कोथंबिरे हे दोघे फरार असून त्यांचा शोध सुरू आहे.
या कारवाई सोबतच याच DYSP संतोष खाडे यांना मिळालेल्या दुसऱ्या गुप्त माहितीच्या आधारे,जामखेड पोलीस स्टेशन हद्दीतील नगर-जामखेड रोडवरील हॉटेल कृष्णा येथे बेकायदा दारू विक्री होत असल्याचे निदर्शनास आले असता पोलिसांनी छापा टाकून तुकाराम रामराव ढोले (रा. सारोळा) याला अटक केली असून, त्याच्याकडून ११,०२५/- रुपयांची विदेशी दारू व बियर जप्त करण्यात आली. या प्रकरणी जामखेड पोलीस स्टेशन गु.र.नं. ३५९/२०२५ महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५(ई) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही कारवाई पोलीस अधीक्षक श्री.सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक श्री. प्रशांत खैरे,अपर पोलीस श्री.वैभव कलूबर्मे (श्रीरामपूर विभाग), उपविभागीय पोलीस अधिकारी श्री.सुनिल पाटील (कर्जत), तसेच विशेष पथक प्रमुख परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक संतोष खाडे,पोसई. राजेंद्र वाघ,शकील शेख,शंकर चौधरी,अरविंद भिंगारदिवे,अजय साठे,मल्लिकार्जुन बनकर,दिनेश मोरे,दिगंबर कारखिले,उमेश खेडकर,सुनिल दिघे,अमोल कांबळे,जालिंदर दहिफळे,दिपक जाधव,विजय ढाकणे यांनी केली आहे.