धम्म,संस्कृती आणि विचारांचा महासंगम..! माजी मंत्री कालकथित दादासाहेब रुपवते जयंती निमित्त भंडारदरा येथे भव्य धम्मयात्रा
संगमनेर (प्रतिनिधी/नितीनचंद्र भालेराव):- आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते तथा दादासाहेब रुपवते यांच्या जयंतीनिमित्त २८ फेब्रुवारी रोजी भंडारदरा येथे भव्य धम्म यात्रेचे आयोजन करण्यात आले असून, धार्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी अनुभवायला मिळणार आहे.ता.अकोले, जिल्हा अहिल्यानगर येथील मुलगंध कुटी, जेतवन, भंडारदरा येथे ही धम्म यात्रा पार पडणार असून, यानिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रम, धम्म सभा आणि मान्यवरांच्या उपस्थितीत विचारमंथनाचा सोहळा रंगणार आहे.धम्म यात्रेनिमित्त आयोजित धम्म सभेचे अध्यक्षस्थान ॲड. संघराज रुपवते भूषविणार आहेत. या सभेला आमदार किरण लहामटे, माजी आमदार वैभव पिचड, अमित भांगरे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
तर प्रख्यात विचारवंत डॉ. रावसाहेब कसबे, डॉ. आनंद देवडेकर आणि डॉ. अजित नवले हे प्रमुख वक्ते म्हणून मार्गदर्शन करणार आहेत.या कार्यक्रमात बाबुराव निकाळे, सुरेश रोकडे, आर. बी. अभंग आणि बन्सी त्रिभुवन यांना जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.सकाळी १० वाजता – पोपट सोनवणे यांच्या उपस्थितीत पंचशील ध्वजारोहण,सकाळी ११ वाजता – भदंत नाग घोष (पुणे) यांची धम्मदेसना,दुपारी १२:३० वाजता – स्नेह भोजन,दुपारी १ वाजता – भव्य मिरवणूक,दुपारी २:३० वाजता – ॲड. संघराज रुपवते यांच्या अध्यक्षतेखाली धम्म सभा,या धम्म यात्रेस मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन वंचितच्या राज्य प्रवक्त्या उत्कर्षा रुपवते, धम्म यात्रा कमिटी ग्रामीण विभागाचे अध्यक्ष तथा निमंत्रक पोपटराव सोनवणे, कार्याध्यक्ष के. एस. गायकवाड, सरचिटणीस विनय घोसाळे, खजिनदार सुनील टपाल तसेच धम्म यात्रा कमिटी मुंबई विभागाचे अध्यक्ष तथा निमंत्रक महेंद्र पवार, कार्याध्यक्ष डॉ. सुधाकर शिंदे, सरचिटणीस प्रवीण गवांदे, खजिनदार आशिष रोकडे यांनी केले आहे.
यासह बहुजन शिक्षण संघ, दादासाहेब रूपवते फाउंडेशन, बहुजन सांस्कृतिक केंद्र, जीवक मेडिकल सेंटर, बहुजन हितवर्धक संघ आणि सर्व पदाधिकारी व धम्म यात्रा कमिटी यांच्यावतीने कार्यक्रमाची जोरदार तयारी करण्यात आली आहे. दादासाहेब रुपवते यांच्या विचारांचा जागर आणि धम्माचा संदेश समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी ही धम्म यात्रा ऐतिहासिक ठरणार असल्याचे आयोजकांनी सांगितले आहे.
