वाहतुकीस तसेच वीजतारांना अडथळा ठरणाऱ्या झाडांच्या फांद्या अखेर छाटल्या..! नागरिकांच्या तक्रारीवर नगरसेवक सुरेशभाऊ बनसोडे यांची थेट मैदानात उतरत कारवाई
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-शहरातील प्रभाग क्रमांक १३ मधील मद्रासचाळ आणि केदारे वस्ती परिसरात रस्त्यालगत असलेल्या बाभुळ व पिंपळाच्या झाडांच्या वाढलेल्या फांद्यांमुळे नागरिकांना वाहतुकी दरम्यान तसेच वीजतारांना मोठा अडथळा निर्माण होत होता.या समस्येची दखल घेत महापालिकेच्या माध्यमातून झाडांच्या धोकादायक फांद्यांची छाटणी करण्यात आली.या कामासाठी नगरसेवक तथा स्थायी समिती सदस्य सुरेश भाऊ बनसोडे यांनी स्वतःघटनास्थळी उपस्थित राहून कामाचा आढावा घेतला.त्यांच्या उपस्थितीत महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी झाडांच्या वाढलेल्या फांद्या कापून परिसरातील वाहतुकीचा मार्ग मोकळा केला.स्थानिक नागरिकांनी या कामाचे स्वागत करत नगरसेवकांचे आभार मानले.परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहून त्यांनी आपापल्या समस्या देखील मांडल्या.यावेळी बोलताना नगरसेवक सुरेश भाऊ बनसोडे म्हणाले की, “प्रभागातील नागरिकांच्या अडचणी सोडवणे ही आमची प्राथमिक जबाबदारी आहे.
कोणतीही छोटी किंवा मोठी समस्या असो,नागरिकांसाठी आम्ही २४ तास उपलब्ध आहोत. प्रभागातील विकासकामांना गती देण्यासाठी सतत प्रयत्न सुरू राहतील.”या कारवाईमुळे मद्रासचाळ व केदारे वस्ती परिसरातील वाहतूक सुलभ झाली असून वीजतारांवरील संभाव्य धोका देखील टळला आहे.नागरिकांनी वेळोवेळी अशा समस्यांची माहिती दिल्यास तत्काळ उपाययोजना करण्यात येईल,असेही यावेळी सांगण्यात आले.
