लहानग्या माहिराने ठेवला पहिला रोजा; जुना मोंढा परिसरात आनंदाचा माहोल
छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी): रमजानच्या पवित्र महिन्यानिमित्त सर्वत्र उपवास आणि इबादत केली जात असतानाच, शहरातील जुना मोंढा भागातील एका चिमुकलीने आपल्या जिद्दीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. माहिरा आरशाद लखपती या अवघ्या ८ वर्षीय मुलीने कडक उन्हाची तमा न बाळगता आपल्या आयुष्यातील पहिला रोजा यशस्वीरित्या पूर्ण केला.जिद्दीचा संगम लहान वयात रोजा पाळणे हे शारीरिकदृष्ट्या आव्हानात्मक असते, मात्र माहिराने मोठ्या उत्साहात पहाटे ‘सहरी’ करून दिवसभर अन्न-पाण्याविना राहून आपला संकल्प पूर्ण केला. तिच्या या धार्मिक ओढीचे आणि संयमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
परिसरात आनंदाचे वातावरण
माहिराने पहिला रोजा पूर्ण केल्याबद्दल तिचे वडील आरशाद लखपती, आई, तसेच आजी-आजोबांनी तिचे तोंडभरून कौतुक केले. संध्याकाळी इफ्तारच्या वेळी तिला शुभेच्छा देण्यासाठी परिसरातील नागरिक उपस्थित होते.”लहान वयातच माहिराने दाखवलेली ही शिस्त आणि धर्माप्रती असलेली निष्ठा आम्हा सर्वांसाठी अभिमानास्पद आहे,” अशी भावना तिच्या कुटुंबियांनी व्यक्त केली.तिच्या या यशाबद्दल जुना मोंढा परिसरातील मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईकांकडून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
