Crime..मानवतेला काळीमा फासणारी धक्कादायक घटना.. वडगावपान मध्ये इयत्ता सहावीच्या मुलीवर ॲसिड हल्ला
संगमनेर प्रतिनिधी (नितीनचंद्र भालेराव):-संगमनेर तालुक्यातील वडगावपान येथे मानवतेला काळीमा फासणारी crime धक्कादायक घटना घडली आहे.इयत्ता सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थीनीवर अज्ञात आरोपीने ॲसिड हल्ला केला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. बारा वर्षाच्या मुलीवर ॲसिड हल्ला झाल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. ही विद्यार्थिनी शाळा सुटल्यानंतर आपल्या घरी जात होती. अचानक एका नराधमाने तिच्यावर थेट ॲसिड हल्ला केला. या हल्ल्यात तिच्या चेहऱ्याला गंभीर दुखापत झाली आहे. घटना दुपारी दोन वाजेच्या सुमारास घडली. हल्लेखोर पसार झाला आहे पोलीस शोध घेत आहेत.
हल्ल्यानंतर मुलीने आरडाओरडा केल्याने परिसरातील नागरिक तत्काळ धावून आले. त्यांनी तातडीने पोलिसांना माहिती देत मुलीला उपचारासाठी लोणी येथील खासगी रुग्णालयात दाखल केले.या घटनेनंतर शाळेत शिक्षण घेणाऱ्या मुली सुरक्षित नसल्याने पालक वर्गातून चिंता व्यक्त केली जात आहे.अल्पवयीन मुलीवर अमानुष हल्ला करणाऱ्या नराधमाला तात्काळ अटक करून कठोर शिक्षा द्यावी.या क्रूर हल्ल्यामुळे संगमनेर तालुक्यात भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.अल्पवयीन मुलीवर असा अमानुष हल्ला करणाऱ्या नराधमाला तात्काळ अटक करून कठोर शिक्षा द्यावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
