दिव्यांगांच्या चेहऱ्यावर आनंद.. स्व.मा.आमदार अरुणकाका जगताप यांच्या जयंती निमित्त सामाजिक उपक्रम साजरे..दीनदुबळ्यांची सेवा हाच खरा आदर्श मा.नगरसेवक दगडू मामा पवार
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-राष्ट्रसंत आचार्य आनंद ऋषीजी अपंग कल्याण केंद्र,कल्याण रोड येथे स्वर्गीय आमदार अरुणकाका जगताप यांच्या जयंती निमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. यावेळी दिव्यांग व मतिमंद विद्यार्थ्यांसोबत जयंती साजरी करून त्यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यात आले.

कार्यक्रमात बोलताना माजी नगरसेवक दगडू मामा पवार म्हणाले की, समाजामध्ये वावरताना प्रत्येकाने समाजाचे काहीतरी देणे लागते या भावनेतून काम केले पाहिजे. आपल्या उत्पन्नातून काही रक्कम बाजूला ठेवून दीनदुबळ्यांसाठी खर्च करणे हीच खरी समाजसेवा आहे. दिव्यांग व मतिमंद मुलांची सेवा हीच ईश्वर सेवा आहे, असे त्यांनी सांगितले.ते पुढे म्हणाले की, स्वर्गीय अरुण काका जगताप यांनी नेहमीच सर्वसामान्य नागरिकांना केंद्रस्थानी ठेवून काम केले. त्यांच्या कार्याचा आदर्श प्रत्येकाने अंगीकारणे गरजेचे आहे. दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी दिलेल्या दहा गुंठे जागेमुळे आज या ठिकाणी चांगली शाळा उभी राहिली आहे. त्यांच्या जाण्याला एक वर्ष पूर्ण झाले असले तरी त्यांच्या आठवणी आजही प्रत्येकाच्या मनात जिवंत आहेत, असे त्यांनी नमूद केले.
या कार्यक्रमास माजी नगरसेवक दगडू मामा पवार, विलास ताठे, योगेश ठुबे, बाळासाहेब निकम, पैलवान गोरख खंडागळे, नगरसेवक रेवणनाथ पवार, दीपक खेडकर, नितीन घोडके, विशाल पटवेकर, ब्रिजेश ताठे, स्वप्निल ताठेड, संजूशेठभुतकर, कान्हा भुतकर योगेश आजबे, रोहित भगत, योगेश भुजबळ, कृष्णा वाळुंजकर, सुरज चांदगुडे, सौरभ जरे, दादासाहेब पांडुळे, साहिल चांदगुडे, रोहन दळवी, किरण मेहत्रे, संतोष मगर, सागर नाईकवाडी आदींसह युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी राष्ट्रसंत आचार्य आनंद ऋषीजी अपंग कल्याण केंद्राच्या वतीने स्व. अरुण काका जगताप यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करून त्यांच्या कार्याची आठवण करण्यात आली. उपस्थित कार्यकर्त्यांनी त्यांच्या समाजाभिमुख कार्याचा गौरव केला.
नगरसेवक रेवणनाथ पवार म्हणाले की,
“स्वर्गीय अरुण काकांच्या आठवणींनी मन भावूक होते. त्यांचे विचार नेहमीच ऊर्जा व प्रेरणा देणारे होते. प्रत्येक व्यक्तीची आत्मीयतेने विचारपूस करणारे आणि कुटुंबातील सदस्यांशी जिव्हाळ्याने वागणारे ते नेते होते.ते पुढे म्हणाले की, दगडू मामा पवार मित्र मंडळाच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत दिव्यांग व मतिमंद विद्यार्थ्यांमध्ये जाऊन जयंती साजरी करणे हा सकारात्मक उपक्रम आहे.
