एमआयडीसी पोलिसांचा थरारक ‘सर्जिल स्ट्राईक’! एकाच रात्री गोवंश कत्तलखाना अन् गावठी दारूचे अॅड्डे उद्ध्वस्त; लाखोंचा मुद्देमाल जप्त करत गुन्हेगारांचे धाबे दणाणले..
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील जेऊर बायजाबाई गावात अवैध रित्या सुरू असलेल्या गोवंशीय जातीच्या जनावरांच्या कत्तलखान्यावर पोलिसांनी छापा टाकला आहे.या कारवाईत सुमारे ६०,००० रुपये किमतीचे मांस व कत्तलीचे साहित्य जप्त करण्यात आले असून आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दि.२८/०५/२0२६ रोजी एमआयडीसी पोलीस स्टेशनचे सपोनि माणिक चौधरी यांना जेऊर बायजाबाई येथे अवैध रित्या गोवंशीय जनावरांची कत्तल केली जात असल्याची खात्रीशीर गुप्त माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पोलीस पथकाने पंचांसमक्ष तात्काळ छापा टाकला असता, आरोपींच्या राहत्या घरात बेकायदेशीर कत्तल सुरू असल्याचे उघडकीस आले.महाराष्ट्र राज्यात गोवंशीय जनावरांच्या कत्तलीस सक्त मनाई असतानाही,आरोपींनी आर्थिक फायद्यासाठी हा प्रकार केला.पोलिसांनी घटनास्थळावरून अजिम शरीफ पठाण,अहसान अजिम पठाण (दोन्ही रा. जेऊर बायजाबाई, ता.जि. अहिल्यानगर) व एक अनोळखी इसम यांना ताब्यात घेऊन ६०,०००/- रुपये किमतीचे अंदाजे २०० किलो वजनाचे गोवंशीय जातीचे मांस (किंमत ३००/- रुपये किलो प्रमाणे) आणि कत्तलीसाठी लागणारे लोखंडी व इतर साहित्य जप्त केले आहे.या प्रकरणी आरोपींविरुद्ध एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये गुरनं. ३७७/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३२५, २७१, २७२ सह महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम चे कलम ५(क), ९(अ)(ब) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास एमआयडीसी पोलीस करत आहेत.सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक श्री.मुम्मका सुदर्शन,अपर पोलीस अधीक्षक श्री.वैभव कलुबर्मे,उपविभागीय पोलीस अधिकारी नगर ग्रामीण श्री.शिरीष वमने यांच्या मार्गदर्शनाखाली एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सपोनि श्री.माणिक चौधरी, पोसई.मनोज मोंढे, पोलीस अंमलदार सुशांत दिवटे,ज्ञानेश्वर तांदळे,शुभम सुद्रुक,गोरक्षनाथ जावळे,जयसिंग शिंदे,सचिन हरदास यांनी केली आहे.
बातमी २
निमगाव घाणा आणि टाकळी खातगावमध्ये एमआयडीसी पोलिसांचा ‘सर्जिल स्ट्राईक’; ८६ हजारांचे रसायन व गावठी दारू जागीच नष्ट!
अहिल्यानगर:-एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील निमगाव घाणा व टाकळी खातगाव परिसरात अवैध रित्या रसायन आणि गावठी हातभट्टी दारू बनवणाऱ्या अड्ड्यांवर पोलिसांनी एकाच वेळी छापे टाकले.या धडक मोहिमेत ८६,०००/- रुपये किमतीचा मुद्देमाल जागीच नष्ट करण्यात आला असून ३ दारू विक्रेत्यांना अटक करण्यात आली आहे.दिनांक २८/०५/२0२६ रोजी सपोनि माणिक चौधरी यांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून पोलीस पथकाने खालील तीन ठिकाणी पंचांसमक्ष छापे टाकून धडक कारवाई केली:
१) निमगाव घाणा येथील कारवाई:
आरोपी: राजू सखाराम गव्हाणे (वय ४५ वर्षे, रा. कोळेटेक निमगाव घाणा, ता.जि. अहिल्यानगर).
नष्ट केलेला मुद्देमाल: घराच्या आडोशाला पत्र्याच्या शेडमध्ये लपवलेले ५०,०००/- रु. किमतीचे १००० लिटर कच्चे रसायन आणि २०० लिटर तयार गावठी दारू (किंमत २०,०००/- रु.) व दारू गाळण्याचे साहित्य जागीच नष्ट केले.
२) टाकळी खातगाव येथील पहिली कारवाई (ओढ्यामध्ये):
आरोपी: राजेंद्र विलास पवार (वय २२ वर्षे, रा. खातगाव टाकळी, ता.जि. अहिल्यानगर).
नष्ट केलेला मुद्देमाल: घराच्या पाठीमागील ओढ्यात लपवलेले ५,०००/- रु. किमतीचे १०० लिटर कच्चे रसायन आणि ४,०००/- रु. किमतीची ४० लिटर तयार दारू व साहित्य नष्ट केले.
३) टाकळी खातगाव येथील दुसरी कारवाई (ओढ्यामध्ये):
आरोपी: विनोद दिलीप पवार (वय २२ वर्षे, रा. खातगाव टाकळी, ता.जि. अहिल्यानगर).
नष्ट केलेला मुद्देमाल: ओढ्यात लपवलेले ४,०००/- रु. किमतीचे ८० लिटर कच्चे रसायन आणि ३,०००/- रु. किमतीची ३० लिटर तयार गावठी दारू व साहित्य पोलिसांनी नष्ट केले.अटक केलेल्या तिन्ही आरोपींविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५ ई प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.सदरची कामगिरी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सपोनि श्री.माणिक चौधरी,पोसई.विनोद परदेशी,पोलीस अंमलदार मुकुंद दुधाळ,किशोर जाधव,सचिन हरदास,अक्षय रोहोकले,सुरज देशमुख,उमेश शेरकर यांनी केली आहे.
