स्वतःवरच गोळीबार करून रचला हल्याचा बनाव..४० हजाराची दिली सुपारी..फिर्यादीच निघाला मुख्य ‘मास्टरमाईंड’..! तुळजाभवानी मंदिर परिसर गोळीबार प्रकरणाचा उलगडा..तोफखाना पोलिसांकडून गावठी पिस्तुलासह आरोपी अटक!
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-पाईपलाईन रोडवरील तुळजाभवानी मंदिर परिसरातील पुणेरी अमृततुल्य चहाच्या दुकानासमोर घडलेल्या गोळीबार प्रकरणाला आता अत्यंत नाट्यमय वळण मिळाले आहे.~राजकीय व वैयक्तिक वैमनस्यातून विरोधकांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्यासाठी फिर्यादी चिरंजीव दत्तात्रय गाढवे (वय ३१,रा.गणेश चौक, बोल्हेगाव फाटा) यानेच स्वतःवर गोळीबार घडवून आणल्याचा खळबळजनक खुलासा तोफखाना पोलिसांनी केला आहे.पोलिसांनी या प्रकरणी सुपारी घेऊन गोळीबार करणाऱ्या मुख्य आरोपीला गावठी कट्ट्यासह अटक केली आहे.सीसीटीव्ही आणि संशयित:तपास पथकाने घटनास्थळाचे सीसीटीव्ही फुटेज व गोपनीय माहितीच्या आधारे विधीसंघर्षित बालकांना ताब्यात घेतले.पोलिसांनी भिंगार येथून आरोपी ऋतिक आनंद हरिहर (वय १९ वर्षे) याला सापळा रचून अटक केली.
त्याची कसून चौकशी केली असता,फिर्यादी चिरंजीव गाढवे यानेच स्वतःवर हल्ला करण्यासाठी ४०,००० रुपयांची सुपारी दिल्याची कबुली त्याने दिली.आरोपी ऋतिक हरिहर याच्याकडून गुन्ह्यात वापरलेले ४०,०००/- रुपये किमतीचे एक गावठी पिस्तुल (कट्टा) पोलिसांनी जप्त केले आहे.सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्री.मुम्माका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक श्री. वैभव कलुबर्मे,डॉ.दिलीप टिपरसे उपविभागीय पोलीस अधिकारी नगर शहर विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली तोफखाना पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक जगदीश भांबळ आणि गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक योगेश चाहेर व गुन्हे शोध पथकातील (DB Team) अंमलदार पो.हे.कॉ.नितीन उगलमुगले,पो.हे.कॉ.अरुण गांगुर्डे,भानुदास खेडकर,अब्दुलकादर इनामदार,सुधीर खाडे,सुरज वाबळे,पो.कॉ.सुमित गवळी,अविनाश बर्डे,सतिष त्रिभुवन,सुजय हिवाळे,सतिष शिंदे,बाळासाहेब भापसे,कपिल गायकवाड,भागवत बांगर,शाकीर सय्यद,म.पो.ना.जिजा खुडे,म.पो.कॉ.कल्पना अवसरे,तांत्रिक तपासात मदत करणारे दक्षिण मोबाईल सेलचे पो.कॉ.राहुल गुंडू,नितीन शिंदे,अरुण सांगळे यांनी केली आहे.
