पारनेर हद्दीत अवैध दारू अड्यांवर छापा..७ हॉटेल्सवर कारवाई, ८३ हजारांचा मुद्देमाल जप्त!पोलीस अधीक्षकांच्या आदेशाने एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; ७ आरोपी अटकेत!
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-जिल्हा पोलीस अधीक्षक श्री.मुम्माका सुदर्शन यांच्या थेट आदेशाने एमआयडीसी पोलिसांनी पारनेर पोलीस स्टेशनच्या हद्दीत सुरू असलेल्या अवैध देशी-विदेशी दारू विक्रीच्या अड्यांवर धडक कारवाई केली आहे.भाळवणी, टाकळी ढोकेश्वर आणि भनगडेवाडी या गावांमधील विविध हॉटेल्सवर एकाच वेळी छापे टाकून पोलिसांनी एकूण ८३,४९०/- रुपये किमतीची बेकायदेशीर दारू जप्त केली असून ७ जणांना ताब्यात घेतले आहे.या कारवाईत ७ हॉटेल्स आणि आरोपींवर ‘महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम १९४९’ चे कलम ६५(ई) प्रमाणे एकूण ०७ गुन्हे पारनेर पोलीस स्टेशन येथे दाखल करण्यात आले आहेत:
कारवाई झालेली हॉटेल्स व आरोपींची नावे:
१) हॉटेल साई चायनीज (भाळवणी): आरोपी अयज बापू भिसे (वय २५ वर्षे, रा. भाळवणी, ता. पारनेर) याच्याकडून ९,४१५/- रुपये किमतीची दारू जप्त.
२) हॉटेल मदुरा (भाळवणी): आरोपी बाबासाहेबत सिताराम रोहोकले (वय ३४ वर्षे, रा. भाळवणी, ता. पारनेर) याच्याकडून ८,१८५/- रुपये किमतीची दारू जप्त.
३) हॉटेल समाधान (भनगडेवाडी): आरोपी शुभम किरण रोहोकले (वय २२ वर्षे, रा. भाळवणी, ता. पारनेर) याच्याकडून १३,४४०/- रुपये किमतीची दारू जप्त.
४) हॉटेल न्यू समाधान (भनगडेवाडी): आरोपी धिरज बाजीराव ठोकळ (वय २४ वर्षे, रा. भनगडेवाडी, ता. पारनेर) याच्याकडून १३,४३०/- रुपये किमतीची दारू जप्त.
५) हॉटेल वर्षा (टाकळी ढोकेश्वर): आरोपी दिनकर आनंदा नवले (वय ५० वर्षे, रा. टाकळी ढोकेश्वर, ता. पारनेर) याच्याकडून १७,२८५/- रुपये किमतीची दारू जप्त.
६) हॉटेल रायबा (भाळवणी): आरोपी महेश गोरख रोहोकले (वय ३४ वर्षे, रा. भाळवणी, ता. पारनेर) याच्याकडून ६,१२०/- रुपये किमतीची दारू जप्त.
७) हॉटेल गावकरी (टाकळी ढोकेश्वर): आरोपी महेश कृष्णाजी उर्फ बाबासाहेब झावरे (वय ३५ वर्षे, रा. टाकळी ढोकेश्वर, ता. पारनेर) याच्याकडून १५,६१५/- रुपये किमतीची दारू जप्त केली आहे. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्री.मुम्माका सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली एम.आय.डी.सी.पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सपोनि माणिक बी.चौधरी,पोसई विनोद परदेशी,सफौ.राकेश खेडकर, पोहेकॉ.राजु सुद्रीक,पोहेकॉ भास्कर मिसाळ,पोहेकॉ मुकुंद दुधाळ,पोहेकॉ साईनाथ टेमकर, पोकॉ दिपक फुंदे,पोकॉ नवनाथ दहिफळे,पोकॉ किशोर जाधव, पोकॉ अक्षय रोहोकले, पोकॉ उमेश शेरकर आणि पोकॉ सुधीर गवारी यांच्या पथकाने ही यशस्वी कामगिरी बजावली आहे.जप्त केलेला सर्व मुद्देमाल आणि आरोपींना पुढील कायदेशीर कारवाईसाठी पारनेर पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.
