चिखलमय रस्त्यांवर माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या सहकार्यातून मुरुम..हिवरगाव पावसा येथील विद्यार्थी व शेतकऱ्यांना दिलासा
संगमनेर प्रतिनिधी (नितीनचंद्र भालेराव):-हिवरगाव पावसा येथे दमदार पावसामुळे गावातील सर्वच रस्त्याचे चिखलमय झाले होते.काटेरी झुडपे आणि वारंवार होणारा चिखल असे चित्र सध्या या रस्त्यावर दिसत आहे. यामुळे विद्यार्थी शेतकरी नागरिकांची गैरसोय होत आहे. विद्यार्थ्यांनाही चिखल तुडवत शाळेची वाट पार करावी लागते.
गावाला जोडणाऱ्या सर्वच रस्त्याची सध्या दुरवस्था झाल्यामुळे मरून टाकण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत होती. परंतु प्रशासक असल्यामुळे निधी उपलब्ध होण्यासाठी अडचणी येत होत्या. शेतकऱ्यांच्या अडचणीची दखल घेत माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी तातडीने मुरूम उपलब्ध करून दिला.राजहंस दूध संघा मार्फत जेसीबी,ट्रॅक्टरच्या सहाय्याने हिवरगाव पावसा येथील चिखलम रस्त्यावर मुरूम टाकण्यात येत आहे. त्यामुळे गावातील शेतकरी नागरिक विद्यार्थी वर्गातून समाधान व्यक्त होत आहे.
ठिकठिकाणी पडलेले खड्डे सध्या पावसामुळे चिखलमय झाले आहेत.याच चिखलातून सध्या धोकादायक पद्धतीने शेतकरी व नागरिकांना वाट काढवी लागत आहे. या रस्त्यालगत असलेल्या विद्यार्थ्यांना चिखलमय रस्त्यावरून शाळेला यावे लागते. अमरधाम जवळील ओढ्यातील रस्ता आणि गावातील इतर असते धोकादायक बनल्याचे फोटो समाज माध्यमातून वायरल झाले.त्याची तातडीने दखल माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी चिखलमय रस्त्यांना मुरूम उपलब्ध करून दिला.जेसीबी ट्रॅक्टरच्या सहाय्याने हिवरगाव पावसा गावातील चिखलमय रस्त्यांना मुरूम टाकणे कमी माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली गावातील काँग्रेस कार्यकर्ते मेहनत घेत आहेत.तसेच मुसळधार पाऊस आणि प्रवरा नदीला पूर आल्याने पाणीपुरवठा आठ दिवसांपासून गावातील विस्कळीत झाला होता.त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला होता. या वेळी राजहंस दूध संघाचे संचालक यांनी चेअरमन रणजीत देशमुख यांच्या कडे पाठपुरावा केला असता त्यांच्या सहकार्यातून गावातील नागरिकांना राजहंस दूध संघा मार्फत पिण्याचा पाण्याचा टॅकर उपलब्ध करून देण्यात आला.
