जिल्ह्यात दहशतीचे साम्राज्य..खून,बलात्कार अन् दरोड्यांचे साम्राज्य रचणाऱ्या ‘त्या’ ३ जणांवर पोलिसांचा हातोडा १ वर्षासाठी हद्दपार..!
महाराष्ट्र न्यूज 24(अहिल्यानगर):-शहर आणि परिसरात दहशत माजवून शरीराविरुद्ध व मालाबाबत गंभीर गुन्हे करणाऱ्या सराईत गुन्हेगारांविरुद्ध अहिल्यानगर पोलिसांनी आता थेट ‘झिरो टॉलरन्स’ची भूमिका घेतली आहे.कोतवाली,तोफखाना आणि भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुंडगिरी, बलात्कार,दरोडा आणि जातीय तेढ निर्माण करणाऱ्या कुख्यात टोळीप्रमुख सरवर अस्लम शेख उर्फ भिम्या आणि त्याच्या २ साथीदारांना १ वर्षासाठी अहिल्यानगर जिल्ह्यातून हद्दपार (तडीपार) करण्यात आले आहे.पोलीस अधीक्षक यांनी कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी हे कडक आदेश जारी केले आहेत.सरवर अस्लम शेख उर्फ भिम्या (टोळीप्रमुख) रा.झेंडीगेट, सुभेदार गल्ली,अहिल्यानगर,
रेहान रऊफ शेख (वय २८) (टोळी सदस्य) रा.नालसाब चौक,सुभेदार गल्ली,झेंडीगेट, अहिल्यानगर,मुजम्मील शहीद शेख (वय २६) (टोळी सदस्य) – रा.घर नं.१८६६, जिलाणी बिल्डींग,अहिल्यानगर असे तडीपार झालेले इसमांचे नावे आहेत.
पोलीस निरीक्षक (कोतवाली पोलीस स्टेशन) यांनी सादर केलेल्या प्रस्तावानुसार,या टोळीवर घातक शस्त्रांसह खुनाचा प्रयत्न करणे,दरोडा टाकणे व दडपशाहीने बलात्कार करणे
अनुसूचित जाती/जमातीच्या व्यक्तींना जातीवाचक शिवीगाळ व गंभीर दुखापत अल्पवयीन मुलीची छेडछाड (लज्जा उत्पन्न करणे) दोन समाजात तेढ निर्माण करून द्वेष पसरवणे असे अनेक गुन्हे यांच्यावर दाखल आहेत.यापूर्वीच्या हद्दपारी आदेशाचा भंग करणे,जिल्ह्यात संघटित गुन्हेगारी,गोवंश तस्करी,वाळू चोरी,हत्यार कायद्याचे उल्लंघन आणि शरीराविरुद्ध गुन्हे करणाऱ्या इतर टोळ्यांची माहिती संकलित करण्याचे काम सुरू आहे.येत्या काळात अशा अनेक टोळ्यांवर हद्दपारीची कठोर कारवाई केली जाईल अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी दिली.
