LCB चा दणका..! गुटखा-मावा माफियांचे साम्राज्य उद्ध्वस्त लाखोंचा गुटखा अन मावा जप्त..
महाराष्ट्र न्यूज 24 (अहिल्यानगर):-अहिल्यानगर जिल्ह्यात अवैध धंद्यांविरोधात पोलिसांनी आता थेट ‘झिरो टॉलरन्स’ मोहीम उघडली आहे.स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) पाथर्डी पोलीस ठाण्याच्या हद्दीत धडक कारवाई करत अवैध सुगंधी तंबाखू,गुटखा आणि मावा विक्री करणाऱ्या अड्ड्यांवर सर्जिकल स्ट्राईक केला आहे. या धडक कारवाईत तब्बल ₹४,४५,१८१ चा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एकूण ५ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी जिल्ह्यातील सर्व प्रकारच्या अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्याचे सक्त आदेश स्थानिक गुन्हे शाखेला दिले होते.
या आदेशानुसार एलसीबीचे पोलीस निरीक्षक श्री.संतोष मुटकुळे यांनी तातडीने विशेष पथक तयार केले.पोलीस अंमलदार अभिजीत अरकल,राहुल डोके, अमोल आजबे,रणजीत जाधव,योगेश कर्डीले, रमीजराजा आतार आणि सतीष भवर यांच्या पथकाने पाथर्डी परिसरात सापळा रचला.२ ऑगस्ट २०२६ रोजी गुप्त बातमीदाराच्या माहितीवरून पंचांसमक्ष एकाच वेळी ३ वेगवेगळ्या ठिकाणी धाडी टाकून गुटखा माफियांचे कंबरडे मोडले.
