स्वातंत्र्यदिनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर माविम च्या भ्रष्टाचारा विरोधात ‘रिपब्लिकन पार्टी ऑफ महाराष्ट्र’ चे महाधरणे आंदोलन
छत्रपती संभाजीनगर (दि. 6 ऑगस्ट):-महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम), छत्रपती संभाजीनगर अंतर्गत ‘पोर्टेबल वेंडर स्टॉल’ योजनेत झालेल्या कोट्यवधी रुपयांच्या भ्रष्टाचाराप्रकरणी प्रशासनाने भ्रष्ट अधिकारी व कर्मचारी यांच्यावर त्वरित कारवाई न केल्यास, येत्या १५ ऑगस्ट २०२६ रोजी स्वातंत्र्यदिनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ‘रिपब्लिकन पार्टी ऑफ महाराष्ट्र’च्या वतीने लोकशाही मार्गाने महा धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. यासंदर्भात पक्ष प्रमुख राजू भाई साबळे यांच्या नेतृत्वाखालील जिल्हाधिकारी तथा सदस्य सचिव (जिल्हा नियोजन समिती) प्रशासकीय यांची शिष्टमंडळाने भेट घेवून निष्क्रियतेचा निषेध करत या भ्रष्टाचाराची स्वतंत्र चौकशी लावून दोषीं अधिकाऱ्यावर कायदेशीर कारवाई व गुन्हे दाखल न झाल्यास, १५ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी १०:०० वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ‘महाधरणे आंदोलन’ केले जाईल.
तसेच स्वातंत्र्यदिनी उद्भवणाऱ्या कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्नास सर्वस्वी जिल्हा प्रशासन व माविम विभाग जिल्हा कार्यालय जबाबदार राहील, असे निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.या शिष्टमंडळात पक्षाचे जिल्हा अध्यक्ष दिनेश गवळे, राज्य सहसचिव वैभव लोखंडे, मराठवाडा उपाध्यक्ष सुनील खरात, मराठवाडा कार्याध्यक्ष सचिन नवगिरे आणि ज्येष्ठ नेते प्रकाश घोरपडे मध्य शहर अध्यक्ष सिद्धार्थ बोर्डे यांच्यासह पक्षाचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
