संबोधी विद्यार्थी वसतिगृहात स्वातंत्र्य दिन उत्साहात मान्यवरांच्या हस्ते खाऊ वाटप..हिंदू,मुस्लिम,शीख,इसाई सगळे भाऊ, चांगले शिक्षण घेऊन पुढे जाऊ’ पत्रकार महेश भोसले यांचा राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश..
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-देशभरात स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात व राष्ट्रीय सण म्हणून साजरा केला जात असताना,बहुजन शिक्षण संचलित फकीरवाडा येथील संबोधी विद्यार्थी वसतिगृहात स्वातंत्र्य दिनानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.याप्रसंगी विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते खाऊ वाटप करून स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.कार्यक्रमाची सुरुवात ध्वजारोहणाने झाली.निवृत्त नायब तहसीलदार गिरीष गायकवाड व उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते तिरंगा फडकविण्यात आला.यावेळी उपस्थितांनी तिरंग्याला मानवंदना देत सामूहिक राष्ट्रगीत गायले.याप्रसंगी स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा देताना सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार महेश भोसले म्हणाले की,”स्वातंत्र्य दिनाचा वाटत आहोत खाऊ,
हिंदू,मुस्लिम,शीख,इसाई आपण सगळे आहोत भाऊ,शिक्षण घेऊन आपण पुढे,पुढे जाऊ!”या शब्दांत त्यांनी राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देत विद्यार्थ्यांच्या भावी शैक्षणिक कार्यास शुभेच्छा दिल्या.हा उपक्रम गिरीष गायकवाड, सुरेश भिंगारदिवे आणि सुखदेव साळवे यांच्या सहकार्यातून राबविण्यात आला.
या सोहळ्यास ‘देशस्तंभ न्यूज’चे उपसंपादक सुरेश भिंगारदिवे,सामाजिक कार्यकर्ते सुखदेव साळवे, पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या जिल्हाध्यक्षा व शांतता समिती सदस्या गौतमी भिंगारदिवे, रियांश मल्टीस्टेटच्या उद्योजिका शोभा माने,दुर्गा काटे आणि लता बर्डे आदी मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक व उत्कृष्ट सूत्रसंचालन वसतिगृहाचे अधीक्षक रविंद्र तपासे यांनी केले.तसेच त्यांनी उपस्थित सर्व मान्यवरांचे स्वागत व सत्कार केला.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वसतिगृहाचे मदतनीस महेंद्र शिंदे,महिला कर्मचारी तसेच वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले.
