लोकशाहीर,साहित्यरत्न महाकवी वामनदादा कर्डक यांच्या १०४ व्या जयंतीनिमित्त रिपब्लिकन पार्टी ऑफ महाराष्ट्रतर्फे विनम्र अभिवादन..!
छत्रपती संभाजीनगर (दि.१५ ऑगस्ट):-आंबेडकरी चळवळीतील अग्रगण्य विचारवंत, प्रबोधनकार, लोकशाहीर, साहित्यरत्न महाकवी वामनदादा कर्डक यांच्या १०४ व्या जयंतीनिमित्त ‘रिपब्लिकन पार्टी ऑफ महाराष्ट्र’च्या वतीने त्यांच्या मुकुंदवाडी येथील वामनदादा यांच्या पुतळ्यास पक्षाचे राज्य सहसचिव वैभव लोखंडे यांनी पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.मुकुंदवाडी परिसरातील संजय नगर येथे आयोजित या अभिवादन कार्यक्रमात पक्षाचे पक्षप्रमुख राजुभाई साबळे उपस्थितांनी वामनदादांच्या क्रांतीकारी विचारांचे स्मरण केले.
“वामनदादांनी आपल्या लेखणीतून आणि शाहिरीतून शोषित, वंचित समाजाला स्वाभिमानाने जगण्याची दिशा दिली. त्यांचे विचार आजही समाजाला मार्गदर्शक ठरत आहेत,” अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. यावेळी मराठवाडा उपाध्यक्ष सुनील खरात, जिल्हाध्यक्ष दिनेश गवळे, शहराध्यक्ष रणजीत मनोरे, ज्येष्ठ नेते प्रकाश घोरपडे, मध्य शहराध्यक्ष सिद्धार्थ बोर्डे शहर संघटक फाईम शेख शाहीर अशोक शिरसाठ गोरख शिंदे आदी उपस्थित होते.
