‘त्या’ प्रतिष्ठित पत्त्याच्या क्लबवर तोफखाना पोलिसांचा छापा ! ८ जण रंगेहात ताब्यात..
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-शहरातील कुष्ठधाम रोडलगत ओढ्याजवळील अर्धवट बांधकाम झालेल्या इमारतीत पत्त्यांचा जुगार सुरू असल्याची गुप्त माहिती मिळताच तोफखाना पोलिसांनी धडक कारवाई केली.पोलिसांनी छापा टाकून ८ जुगाऱ्यांना ताब्यात घेत ७३ हजार ४३० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.या कारवाईत गणेश जालिंदर गायकवाड,सुनील अशोक मांजरे,हिरामण राजेंद्र पवार,कुंडलिक दत्तात्रय गायकवाड,विशाल सोमणाथ पवार,राजू मोतीराम शिंदे,अंकुश भिमराव मांजरे,आणि संतोष पोपट गायकवाड यांच्यावर कारवाई करण्यात आली.याप्रकरणी महाराष्ट्र जुगार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास पो.हे.कॉ.रमेश शिंदे करीत आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन,अपर पोलीस अधीक्षक वैभव कलूबर्मे, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.दिलीप टिपरसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बालाजी वैद्य यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे शोध पथकाचे प्रमुख पोलीस उपनिरीक्षक योगेश चाहेर,पोलीस अंमलदार दिनेश मोरे, भानुदास खेडकर,अब्दुल कादर इनामदार,सुरज वाबळे, सुमित गवळी,अविनाश बर्डे,सतीश त्रिभुवन,सुजय हिवाळे,बाळासाहेब भापसे,भागवत बांगर,शाकीर सय्यद,कपिल गायकवाड,सतीश शिंदे,महिला पोलीस जिजा खुडे व कल्पना अवसरे यांनी केली आहे.
