‘Grindr’ अॅपवर मैत्री,निर्जनस्थळी भेट अन्..तरुणासोबत घडला भयानक प्रकार..कोतवाली पोलिसांनी तिघांना ठोकल्या बेड्या..
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-डेटिंग किंवा सोशल मीडिया अॅपवरून अनोळखी व्यक्तींशी ओळख करणे एका तरुणाला चांगलेच महागात पडले आहे.ऑनलाईन ‘Grindr’ अॅपद्वारे आधी ओळख करून नंतर निर्जनस्थळी भेटायला बोलावून तरुणाला मारहाण करत लुटणाऱ्या एका टोळीचा कोतवाली पोलिसांनी पर्दाफाश केला आहे.या कारवाईत पोलिसांनी तीन तरुणांना बेड्या ठोकल्या असून १ लाख २ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.मिळालेल्या माहितीनुसार,बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील लोणी सय्यदमीर येथील एका तरुणाशी भामट्यांनी ‘Grindr’ अॅपद्वारे ओळख वाढवली. त्यानंतर ४ सप्टेंबर रोजी त्याला अहिल्यानगरमधील केडगाव लिंक रोड येथे निर्जनस्थळी भेटण्यासाठी बोलावण्यात आले.तरुण तिथे पोहोचताच दबा धरून बसलेल्या टोळक्याने संगनमत करून त्याच्यावर लाकडी दांडक्याने प्राणघातक हल्ला चढवला.मारहाण करत आरोपींनी फिर्यादीच्या खिशातील रोख ७,५०० रुपये आणि फोन पे (PhonePe) द्वारे जबरदस्तीने ५,००० रुपये ट्रान्सफर करून घेत एकूण १२,५०० रुपयांची रोकड लुटली.
या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात भा.दं.वि. कलम ३०९(४) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन कोतवाली पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने घटनास्थळाचे सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपास सुरू केला.गोपनीय बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून यश मनोज भिंगारदिवे (वय २१,रा.संजयनगर,श्रीरामपूर),सिद्धांत दत्तात्रय जगताप (वय २२,रा. रेल्वे स्टेशन,इंगळे वस्ती, अहिल्यानगर),सुमीत संजय गायकवाड (वय २२, रा. रेल्वे स्टेशन,इंगळे वस्ती, अहिल्यानगर) या तीन आरोपींना शिताफीने ताब्यात घेतले.आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेली एक अॅक्सेस मोपेड दुचाकी,दोन मोबाईल फोन आणि रोख १२,५०० रुपये असा एकूण १ लाख २ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.सदरची यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन,अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.दिलीप टिपरसे यांच्या मार्गदर्शनाखाली कोतवाली पोलीस ठाण्याचे
पोलीस निरीक्षक नितीन देशमुख,सपोनि.कुणाल सपकाळे,पोउपनि.गणेश देशमुख,पोलीस अंमलदार विशाल दळवी,विनोद बोरगे,दौंड,पोहेकॉ/साबीर शेख,पोहेकॉ/राहूल शिंदे, मपोहेकॉ/रोहीणी दरंदले, दिपक रोहकले,सत्यजित शिंदे, अमोल गाडे,अतुल काजळे, शिरीष तरटे,अतुल कोतकर, रमेश शिंदे,संकेत थिवर,सुरज कदम,राहुल मासाळकर, सचिन लोळगे,गंगाधर आंग्रे, अतुल लाटे,मपोकॉ/पल्लवी रोहकले,दक्षिण मोबाईल सेलचे पोकॉ/राहुल गुंडू,पोकॉ/अरुण सांगळे यांनी केले आहे.
