स्थानिक गुन्हे शाखेची वादळी कारवाई:३ लाखांहून अधिक किमतीचा विषारी साठा जप्त..शहरासह ग्रामीण भागातील गुटखा तस्करांचे धाबे दणाणले..!
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-जिल्ह्यात तरुणाईला व्यसनाच्या गर्तेत लोटणाऱ्या अवैध गुटखा आणि सुगंधित तंबाखू माफियांवर स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) एकाच वेळी धडक कारवाई करत मोठी खळबळ उडवून दिली आहे. पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या थेट आदेशानंतर एलसीबीच्या विशेष पथकांनी तोफखाना,शेवगाव आणि श्रीरामपूर अशा तीन प्रमुख भागांत एकाच वेळी छापे टाकले.या मोहिमेत तब्बल ३ लाख ०५ हजार ७५६ रुपयांचा अवैध गुटखा आणि माव्याचा साठा जप्त करण्यात आला असून,१३ आरोपींविरुद्ध ५ गंभीर गुन्हे दाखल झाले आहेत.स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या नेतृत्वाखाली उपनिरीक्षक अनंत सालगुडे, कृष्णकुमार सेदवाड यांच्यासह अंमलदारांची ३ विशेष पथके तयार करण्यात आली होती. १३ व १४ सप्टेंबर रोजी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे तोफखाना,शेवगाव व श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकाच वेळी ५ वेगवेगळ्या ठिकाणी धाडी टाकल्या.पोलिसांची चाहूल लागताच गुटखा माफियांमध्ये प्रचंड पळापळ झाली.तौकीर फकीरमहंमद देशमुख (वय ३४, रा.पाचपीर चावडी, अहिल्यानगर),अश्पाक फकीरमहंमद शेख (वय ४२, रा.झेंडीगेट,अहिल्यानगर),नदीम अजीज शेख (रा.वॉर्ड नं.२, श्रीरामपूर) फरार,शेवगाव पोलीस ठाणे हद्द (गु.र.नं. ७२७/२०२६),अभिषेक संजय साळवे (वय २०,रा.पैठण रोड, शेवगाव),मेघराज राजेंद्र खंडागळे (रा.हसनापूर,ता. शेवगाव) फरार,अयान खैरूद्दीन शेख (रा.नाईकवाडी मोहल्ला,शेवगाव) फरार,शेवगाव पोलीस ठाणे हद्द (गु.र.नं. ७२८/२०२६),कृष्णा शंकर पवार (वय ३१,रा.नेवासा रोड, शेवगाव),गोपाल शंकर पवार (वय ३१,रा.नेवासा रोड, शेवगाव),शेवगाव पोलीस ठाणे हद्द,कामरान शौकत तांबोळी (वय २१,रा.मिरी रोड, शेवगाव),जुनेद इनामदार (रा. शेवगाव) फरार,श्रीरामपूर शहर पोलीस ठाणे,निलेश राजेंद्र वदक (वय ३२,रा.रेणुकानगर, श्रीरामपूर),अमीर मेहमुद खान (वय ३३,रा.वॉर्ड नं. २, श्रीरामपूर),नदीम अजीज शेख (रा. वॉर्ड नं.२,श्रीरामपूर, सर्व आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम १२३, २२३, २७४, २७५, ३(५) अन्वये अन्न व सुरक्षा कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.
फरार आरोपींच्या शोधासाठी पोलिसांनी शोधमोहीम तीव्र केली आहे.सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे,पोलीस उपनिरीक्षक अनंत सालगुडे, कृष्णकुमार सेदवाड,पोलीस अंमलदार संदिप पवार,विजय ठोंबरे,अतुल लोटके,रणजीत जाधव,बाळासाहेब नागरगोजे, निळकंठ कारखेले,अरूण गांगुर्डे,अशोक लिपणे,संतोष भवर,बाळासाहेब खेडकर, रमीजराजा आतार,भगवान थोरात,सुनिल मालणकर, आजिनाथ पाखरे यांनी केली आहे.
