LCB चा दणका..सोनाराचं दुकान फोडणारी टोळी जेरबंद..
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-कर्जत शहरातील ‘ओम ज्वेलर्स’ फोडून चांदीचे दागिने लंपास करणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) पर्दाफाश केला आहे.पोलिसांनी अत्यंत शिताफीने सापळा रचून या टोळीतील दोघांसह चोरीचा माल घेणाऱ्या एकाला ताब्यात घेतले असून,मिरजगावमधील चोरीचा आणखी एक गुन्हा उघडकीस आणला आहे.कर्जतमधील सोनारगल्ली येथील उमेश प्रदीप कुलथे यांच्या ‘ओम ज्वेलर्स’चे शटर तोडून अज्ञात चोरट्यांनी चांदीचे दागिने चोरले होते.पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या आदेशानुसार, LCB निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने तांत्रिक विश्लेषण व खबऱ्यांच्या मदतीने जामखेड-अहिल्यानगर रस्त्यावरील टाकळीफाटा येथे सापळा रचून मुख्य संशयितांना पकडले.आरोपींनी १० सप्टेंबर रोजी मिरजगाव येथील सराफाचे दुकान फोडण्याचा प्रयत्न फसला असता,तिखी शिवारातून दुचाकी (MH-16-BP-4642) पळवल्याची कबुली दिली.भगतसिंग सुरेशसिंग बावरे (वय २५,रा.अमळनेर,जि. बीड),लखनसिंग शेरसिंग टाक (वय २४,रा.वडवणी,जि.बीड),दत्तात्रय मुरलीधर म्हस्के (वय ३८,रा.बाहेगव्हाण,जि.बीड) व चोरीचा माल घेणारा) त्यांचा फरार साथीदार गोविंदसिंग संपतसिंग बावरे (रा. अमळनेर,जि.बीड),सनीसिंग जितेंद्रसिंग गोवे (रा. नाथचिकली,जि.बीड),अजयसिंग महेंद्रसिंग बावरे (रा.गोलाई मार्केट,जि.लातूर) अशांना ताब्यात घेण्यात आले आहे.
सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे, सपोनि हरिष भोये,अंमलदार सोमनाथ झांबरे,शामसुंदर जाधव,किशोर शिरसाठ, भाऊसाहेब काळे,रोहित मिसाळ,दिपक जाधव, फुरकान शेख व प्रशांत राठोड यांनी ही धडक कारवाई केली.सर्व आरोपींना पुढील तपासासाठी कर्जत पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.
